song out : ‘पिया मोरे’ म्हणत, इमरान हाश्मीच्या जवळ आली सनी लिओनी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 13:44 IST
अजय देवगण व इमरान हाश्मी स्टारर ‘बादशाहो’ची चर्चा सुरु झाली आहे. होय, या चित्रपटातील इमरान हाश्मी आणि सनी लिओनी यांच्यातील एक हॉट गाणे सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. ‘बादशाहो’च्या मेकर्सनी आपल्या चित्रपटातील ‘पिया मोरे’ हे सुपरहिट गाणे आज रिलीज केले.
song out : ‘पिया मोरे’ म्हणत, इमरान हाश्मीच्या जवळ आली सनी लिओनी!
अजय देवगण व इमरान हाश्मी स्टारर ‘बादशाहो’ची चर्चा सुरु झाली आहे. होय, या चित्रपटातील इमरान हाश्मी आणि सनी लिओनी यांच्यातील एक हॉट गाणे सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. ‘बादशाहो’च्या मेकर्सनी आपल्या चित्रपटातील ‘पिया मोरे’ हे सुपरहिट गाणे आज रिलीज केले. या गाण्याबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. ही उत्सुकता का होती, हे गाणे पाहिल्यानंतर तुम्हाला कळून येईलच. जबरदस्त संगीत शिवाय इमरान हाश्मी व सनी लिओनीची हॉट केमिस्ट्री हे या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. इमरान व सनीची केमिस्ट्री बघण्यात तुम्ही इतके गुंग व्हाल की, कदाचित तुमचे गाण्याकडे लक्षच जाणार नाही. हे गाणे खºया अर्थाने इमरानचे ‘इंट्रोडक्शन साँग’ आहे. इमरान या चित्रपटात राजस्थानच्या एका स्थानिक गुंडाची भूमिका साकारतो आहे. आपल्याच मस्तीत वावरणा-या त्याच्या भूमिकेला हे गाणे अगदी ‘फिट’ बसले आहे. या गाण्याचा सेट अफलातून आहे. गाण्यात राजस्थानातील जी लोकेशन्स दाखवली आहेत,ती प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत का? या प्रश्नाचे उत्तर थोडे कठीण आहे. पण प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अशा गोष्टी खूप ‘कॉमन’ आहेत.‘बादशाहो’तील या गाण्याचे शब्द आहेत, मनोज मुंतसिर यांचे. नीति मोहन आणि मिका सिंह यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. अंकित तिवारीचे संगीत आहे.‘बादशाहो’ एक अॅक्शन थ्रीलर सिनेमा आहे. मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, इमरान हाश्मी यांच्याशिवाय विद्युत जामवाल, इशा गुप्ता व इलियाना डिक्रूज यांच्या मुख्य भूमिका आहेत. सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.