song out : ‘मुन्ना मायकल’चे ‘डिंग डॉन्ग’ गाणे एकदा ऐकाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2017 13:48 IST
टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकल’चे ‘डिंग डॉन्ग’ आज रिलीज झाले. गेल्या काही दिवसांपासून या गाण्याची प्रतीक्षा होती. या गाण्याचा व्हिडिओ ...
song out : ‘मुन्ना मायकल’चे ‘डिंग डॉन्ग’ गाणे एकदा ऐकाच!
टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकल’चे ‘डिंग डॉन्ग’ आज रिलीज झाले. गेल्या काही दिवसांपासून या गाण्याची प्रतीक्षा होती. या गाण्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर इतकी प्रतीक्षा फळास आली, असेच म्हणायला हवे. या गाण्याला ‘मुन्ना मायकल’चे सुपरहिट गाणे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. विश्वास नसेल तर तुम्हीही या गाण्याचा व्हिडिओ बघायलाच हवा.गाण्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक कराया गाण्यात टायगर श्रॉफ व त्याची हिरोईन निधी अग्रवाल एकमेकांबद्दल प्रेमळ तक्रार करत असल्याचे दिसतेय. टायगर व निधीचे हे गाणे आपल्याला थेट नव्वदीच्या दशकात घेऊन जाते. होय, या गाण्याचा व्हिडिओ गोविंदा व करिश्मा कपूर या सुपरहिट जोडीची आठवण करून देतो. या गाण्यात टायगरचा डान्स बघण्यासारखा आहेच. पण यातील निधीचे ‘लटके झटके’ही कमी बघण्यासारखे नाहीत. टायगरपेक्षा ती कुठेही कमी नाही. कुठे कुठे तिच्या चेह-यावरचे एक्सप्रेशन जबरदस्त आहेत. या गाण्याची हुक लाईन ‘मेरी वाली डिंग डॉन्ग करती है...’ एकदा ऐकायची देर. मग बघा दिवसभर ही एकच ओळ तुमच्या ओठांवर असेल. ‘मुन्ना मायकल’चे हे गाणे कसे वाटले, ते आम्हाला सांगायला विसरू नका. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.‘मुन्ना मायकल’मध्ये टायगर स्ट्रिट डान्सर बनला आहे. लहानपणी रस्त्यांवर नाचून पैसे गोळा करणा-या टायगरला एकदिवस नॅशनल डान्स कॉम्पिटीशनमध्ये भाग घेण्याची संधी मिळते आणि त्याचे नशीब एकदम कलाटणी घेते, अशी ही कथा आहे. ‘मुन्ना मायकल’ हा साबीर खानसोबतचा टायगरला तिसरा चित्रपट आहे. याआधी साबीरच्या ‘हिरोपंती’ आणि ‘बागी’मध्ये टायगर दिसला आहे.