Join us  

सोनम कपूरने BOLD ड्रेसमध्ये पापा अनिल कपूरसोबत दिल्या पोज, झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 3:53 PM

पापा अनिल कपूर सोबत असताना तिने इतका बोल्ड ड्रेस घालावा, हे अनेकांना खटकले. मग काय, नेहमीप्रमाणे सोनम ट्रोल झाली.

ठळक मुद्देसोनमच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर गतवर्षी तिचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा सिनेमा रिलीज झाला होता.

सोनम कपूर म्हणजे बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री. फॅशनच्या बाबतीत सोनम कमालीची ‘बोल्ड’ आहे. पण हाच बोल्डनेस सध्या तिला महागात पडताना दिसतोय. होय, बोल्ड ड्रेसमुळे सोनम ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. निमित्त होते मोहित सूरीच्या ‘मलंग’ या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे. गुरुवारी ‘मलंग’ची स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले. बॉलिवूडचे अनेक स्टार्स या स्क्रिनिंगला हजर होते. सोनम कपूरही पापा अनिल कपूरसोबत यावेळी हजर होती. बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखल्या जाणा-या सोनमने यावेळी ब्लॅक कलरचा ग्लॅमरस ड्रेस परिधान केला होता. निश्चितपणे या ड्रेसमध्ये ती ग्लॅमरस दिसत होती. पण चाहत्यांना तिचा हा ग्लॅमरस अंदाज पचला नाही. विशेषत:  पापा अनिल कपूर सोबत असताना तिने इतका बोल्ड ड्रेस घालावा, हे अनेकांना खटकले. मग काय, नेहमीप्रमाणे सोनम ट्रोल झाली.

आपल्या वडिलांसमोर इतका बोल्ड ड्रेस घालून एखादी मुलगी कशी काय मिरवू शकते? असा सवाल अनेकांनी तिला केला. अनेकांनी तर तिला ‘काही तर लाज बाळग’, असा सल्ला दिला. काहींनी तिला किमान वडिल सोबत असताना तरी कपड्यांचे भान ठेव, अशा शब्दांत ट्रोल केले.

कालपरवाच सोनम अशीच कपड्यांवरून ट्रोल झाली होती. अरमान जैनच्या रिसेप्शनमध्ये तिचा लूक पाहून अनेकांनी तिला ‘दादी’, ‘बुढिया’ असे काय काय म्हणत ट्रोल केले होते. सोनम तिच्या बोल्ड फॅशनसाठी ओळखली जाते. याआधी अनेकदा ती यामुळे ट्रोल झालीय. अर्थात आजपर्यंत सोनमला त्यामुळे काहीही फरक पडला नाही. 

सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर गतवर्षी तिचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा सिनेमा रिलीज झाला होता. पाठापाठ ‘द जोया फॅक्टर’ मध्ये ती झळकली होती.

टॅग्स :सोनम कपूरअनिल कपूरमलंग