बॉलिवूड स्टार्स सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह दिसतात़ कदाचित ती त्यांची गरजही आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीत टिकायचे तर आपल्या कामाची प्रसिद्ध करायला हवी, त्यातून अधिकाधिक आपल्या पदरात पाडून घ्यायला हवे. त्यामुळे प्रत्येक स्टार्स आपला चित्रपट सोशल मीडियावर प्रमोट करताना दिसतो. सोनम कपूरही सोशल मीडियावर अशीच अॅक्टिव्ह राहणारी अभिनेत्री. पण आता सोनम कपूर ट्विटरवर दिसणार नाही. होय, सोनम कपूर अहुजाने ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग सोशल साईटपासून काही काळ ब्रेक घेतला आहे. होय, शनिवारी सोनमने ट्विट करून याची माहिती दिली. विशेष म्हणजे, ट्विटरवरून पसरवल्या जाणाऱ्या नकारात्मकतेला कंटाळून तिने हे पाऊल उचलले. विशेष म्हणजे, यावरूनही सोनम प्रचंड ट्रोल झाली. ‘बहन, कभी वापस आना ही मत...’ अशा शब्दांत युजर्सनी सोनमला ट्रोल केले. सोनमला एकता कपूरने पाठींबा दिला तर लोकांनी तिलाही ट्रोल करणे सुरु केले़.
सोनम कपूरने सोडले ट्विटर! युजर्स म्हणाले, बहन अब कभी वापस मत आना...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 12:03 IST