बॉलिवूड डेब्यूसाठी सोनम कपूरने घटवले होते ३५ किलो वजन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 13:24 IST
बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर हिचा आज (९ जून)वाढदिवस. वाढदिवशी सोनमवर शुभेच्छांचा वर्षावर हो आहे. पण सोनमचा बॉयफ्रेन्ड आनंद अहुजाचे म्हणाल तर त्याने सोनमचा वाढदिवस अगदी हटके अंदाजात साजरा केला.
बॉलिवूड डेब्यूसाठी सोनम कपूरने घटवले होते ३५ किलो वजन!
बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर हिचा आज (९ जून)वाढदिवस. वाढदिवशी सोनमवर शुभेच्छांचा वर्षावर हो आहे. पण सोनमचा बॉयफ्रेन्ड आनंद अहुजाचे म्हणाल तर त्याने सोनमचा वाढदिवस अगदी हटके अंदाजात साजरा केला. फोटोंवरून तरी आनंदसाठी सोनम किती महत्त्वाची आहे, हेच दिसते.आनंदने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यात एका वूडन वॉलवर प्रकाशात झगमगत्या अंदाजात सोनमचे नाव लिहिलेले आहे. या लहानशा व्हिडिओत सोनम कमालीची आंनंदी दिसते आहे. आता बॉयफ्रेन्डने इतक्या स्पेशल अंदाजात वाढदिवस साजरा केला म्हणजे, कोण खूश होणार नाही. आज सोनमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तिच्याबद्दल काही विशेष गोष्टी सांगणार आहोत.सोनमला तिच्या खासगी आयुष्यात कुणीही दखल दिलेली आवडत नाही. आनंद अहुजासोबतच्या नात्याबद्दल ती काहीही बोलली नाही. पण म्हणून तिने आनंदसोबतचे नाते लपवूनही ठेवले नाही. अलीकडे आनंदसोबत ती अगदी बिनधास्त फिरताना दिसते. आनंदबद्दल कुणी अवाक्षरही काढले तर, माझ्या खासगी आयुष्यात दखल देऊ नका, अशी ती दरडावून सांगते. सोनमने पदवीपूर्वीचे शिक्षण सिंगापूरमध्ये घेतले आहे. यानंतर इस्ट लंडन विद्यापीठातून तिने इकॉनॉमिक्स आणि पॉलिटकल सायन्समध्ये पदवी घेतली. सोनमला वाचनाची प्रचंड आवड आहे.प्रवासात तिच्या हातात पुस्तक असतेच असते. पुस्तके माझे मित्र आहेत, असे एका मुलाखतीत सोनम म्हणालीही होती. आपल्या डेब्यू चित्रपटासाठी म्हणजेच ‘सावरियां’साठी सोनमने आपले ३५ किलो वजन कमी केले होते. ‘सावरियां’पूर्वी सोनम खूप हेवी वेट होती. मात्र संजय लीला भन्साळी सोनमला अंजतांच्या मूर्तींप्रमाणे सुंदर मानतात. यानंतर भन्साळींनी सोनमला ‘सावरियां’मधून लॉन्च केले. तुम्हाला कदाचित हे माहित नसेल पण त्यापूर्वी सोनमने भन्साळींना ‘ब्लॅक’च्या चित्रपटादरम्यान अस्टिस्ट केले होते. म्हणजे सोनम या चित्रपटाची असिस्टंट डायरेक्टर होती.अर्जून कपूरच नाही तर रणवीर सिंहही आहे भाऊबोनी कपूरचा मुलगा अर्जून कपूर हा सोनमचा चुलत भाऊ आहे. पण हे फार कमी लोकांना ठाऊक आहे की, रणवीर सिंह हा सुद्धा सोनमचा कजिन आहे. सोनमची आई सुनीताच्या नात्यातून रणवीर सोनमचा मामेभाऊ लागतो.