गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर लग्न करणार अशी चर्चा आहे. होय, बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबत सोनम लग्नगाठ बांधणार, असे कळतेय. या लग्नाची तयारीही सुरू झाल्याचे ऐकवात आहे. अलीकडे सोनम कोलकात्यात आनंदच्या आईसोबत दागिणे खरेदी करताना दिसली होती. यावरून सोनम व आनंदच्या लग्नाच्या बातम्यांना जोर चढला आहे. जयपूरमध्ये या लग्नाचा व्हेन्यू बुक झालायं, इथपर्यंतही चर्चा आहे.
तूर्तास सोनम कपूर ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आर. बल्की दिग्दर्शित हा चित्रपट अरूणाचलम मुरूगनाथनमचच्या आयुष्यावर बेतलेली कथा आहे. या चित्रपटात सोनम कपूरसोबत राधिका आपटे ही सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
ALSO READ : नेपोटिजमचा अर्थ माहित नाही? मग सोनम कपूर सांगतेयं, ते वाचा!
लवकरच सोनम विधू विनोद चोप्राच्या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे. 2016 मध्ये आलेल्या ‘नीरजा’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर सोनम इंडस्ट्रीतून जणू गायब झाली होती. मात्र 2018मध्ये सोनमचे जवळपास तीन चित्रपट रिलीज होणार असल्याचे कळतेय.