Join us  

सोनम कपूरने का मागितली सोनाक्षी सिन्हाची जाहीर माफी??

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 7:31 AM

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने सोनाक्षी सिन्हाची माफी मागितलीय. ती सुद्धा सोशल मीडियावर. होय, आता सोनाची माफी मागण्याइतपत सोनमने ...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने सोनाक्षी सिन्हाची माफी मागितलीय. ती सुद्धा सोशल मीडियावर. होय, आता सोनाची माफी मागण्याइतपत सोनमने काय केले, हा प्रश्न साहजिक आहे. अलीकडे सोनाने एका चॅट शोमध्ये हा अख्खा किस्सा सुनावला होता.सोनाक्षी सिन्हा, फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा हे दोघे अलीकडे नेहा धूपियाच्या एका चॅट शोवर पोहोचले होते. या शोवर नेहाने सोनाक्षीला अनेक प्रश्न विचारले. सोनाक्षीनेही अतिशय प्रामाणिकपणे या प्रश्नांची उत्तरे दिलीत. यातल्याच एका उत्तरामुळे सोनमवर सोनाक्षीची माफी मागण्याची वेळ आली.ALSO READ : सोनम कपूरचा बॉयफ्रेंडसोबतचा पर्सनल व्हिडीओ झाला लीक, पाहा व्हिडीओ!होय, बॉलिवूडमध्ये कधी कुणी अ‍ॅटिट्यूड दाखवले का? असा प्रश्न नेहाने सोनाक्षीला केला. यावर सोनाक्षीने सोनम कपूरचे नाव घेतले होते. सोनमने मला एकदा खूप एटिट्यूड  दाखवले होते. का, ते मलाही कळले नव्हते, असे सोनाने यावेळी सांगितले. सोनाच्या तोंडून आपले नाव ऐकून कदाचित सोनम वरमली आणि तिने लगेच सोनाला माफी मागण्याचे ठरवले. ‘सोनाक्षी मी तुझ्याबद्दल कायम मवाळ राहिली आहे. मी तुला कधी अ‍ॅटिट्यूड दाखवले, मला आठवत नाही. तुला असे वाटत असेल तर मी माफी मागते,’ असे टिष्ट्वट सोनमने केले. आता सोनाक्षीने सोनमला माफ केले की नाही, ते आम्हाला ठाऊक नाही. पण सोनमने दाखवलेला मनाचा मोठेपणा पाहून चाहत्यांना मात्र तिने जिंकले.सध्या सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. सोनम कपूर लवकरच तिचा बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबत लग्नबंधनात अडकणार, असे मानले जातेय. अद्याप सोनमने यास दुजोरा दिलेला नाही. अलीकडे सोनम अक्षय कुमारसोबत ‘पॅडमॅन’मध्ये दिसली.कालपरवाच  हा चित्रपट रिलीज झाला. सोनाक्षीबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.