Join us  

The Kapil Sharma Show! आईबद्दल काय बोलली सोनम कपूर, जरा ऐकाच!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 1:23 PM

‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनिल कपूर आणि सोनम कपूर कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावणार आहेत.

कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा हिट झालाय. आज रविवारी टेलिकास्ट होणाºया या शोमध्ये अनिल कपूर आणि सोनम कपूर हे बाप-लेक धम्माल करताना दिसणार आहे.  ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनिल, सोनम व चित्रपटाची स्टारकास्ट कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावणार आहे. या शोमध्ये सोनम व अनिल दोघांनीही जाम मस्त केली. शिवाय काही मजेशीर किस्सेही शेअर केले.

या शोचा असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या जाम चर्चेत आहे. या व्हिडिओत कपिल सोनमला एक प्रश्न विचारतो आणि यानंतर जे काही घडते, त्यावरून सगळेच खो-खो हसत सुटतात. होय, पापा अनिल कपूर तुम्हा तिन्ही भावंडांमध्ये सर्वाधिक कुणाला सर्वाधिक छळायचे? असा प्रश्न कपिल सोनमला करतो. यावर पापा तर खूपचं कूल आहेत. कुणालाच छळत नाही, असे सोनम अगदी निष्पापपणे सांगते आणि मग अनिल कपूर यांच्याकडे वळत, तुम्हाला काय वाटते, कोण अधिक छळते? असा प्रश्न त्यांना करते. यावर अनिल कपूर, तेरी मम्मी...असे उत्तर देतात. त्यांचे ते उत्तर ऐकून, मी काही बोललेले नाही....असे सोनम म्हणते. हे सगळे ऐकून  कपिल जोरजोरात हसायला लागतो आणि अरे सांग,तुला कुणी काहीही म्हणणार नाही, असे सोनमला म्हणतो. यावर सोनम आईची मज्जा घेत, तुला नाही ठाऊक माझी मॉम कशी आहे? असे म्हणते.

आज रात्री प्रसारित होणाºया या धम्माल एपिसोडमध्ये सोनम व अनिल कपूर आणखीही बरेच मजेशीर खुलासे करताना दिसणार आहेत. एकंदर काय तर कपिल शर्मा शोचा हा एपिसोडही प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. 

टॅग्स :सोनम कपूरअनिल कपूरकपिल शर्मा