Join us  

Happy Anniversary : अशी सुरु झाली होती सोनम कपूर व आनंद अहुजाची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 11:00 AM

बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नाला आज (८ मे) एक वर्ष पूर्ण झाले. गतवर्षी आजच्याच दिवशी सोनम व आनंद यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या.

ठळक मुद्देआनंद हा एका दिल्लीचा मोठा बिझनेसमॅन आहे.

बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नाला आज (८ मे) एक वर्ष पूर्ण झाले. गतवर्षी आजच्याच दिवशी सोनम व आनंद यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. हे लग्न बॉलिवूडच्या ग्रॅण्ड लग्नांपैकी एक होते. अख्खे बॉलिवूड या लग्नाला हजर होते. सोनम आणि आनंद आपल्या  सहजीवनात आनंदी आहेत. केवळ आनंदीच नाही तर दृष्ट लागावी, इतके सुंदर नाते दोघांत आहे. सोशल मीडियावरचे दोघांचेही एकत्र फोटो पाहिल्यानंतर क्षणात हे ‘मेड फॉर इच अदर’ कपल असल्याची खात्री पटते. आज सोनम व आनंदच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त त्यांची लव्हस्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

२०१४ मध्ये सोनम आणि आनंदची पहिली नजरानजर झाली होती. दोघांचीही कॉमन फ्रेन्ड परनिया कुरैशी हिला याचे श्रेय जाते. परनिया दोघांचीही चांगली मैत्रिण आहे. परनियाच्या माध्यमातून सोनम व आनंद पहिल्यांदा भेटले.

आश्चर्य वाटेल पण या पहिल्या भेटीच्या महिनाभरानंतरच आनंदने सोनमला प्रपोज केले आणि इथून या गोड प्रेमकथेची सुरुवात झाली. मे २०१८ मध्ये दोघांनीही लग्न केले.

आनंद व सोनमने एकमेकांना डेट करणे सुरु केले,त्या दिवसापासून बरोबर दोन महिन्यांनी सोनमचा वाढदिवस होता. सोनमच्या वाढदिवसासाठी आनंदने एक सरप्राईज प्लान केले. त्याने एक रेस्टॉरंट बुक केले आणि सोनमच्या आवडीचा मेन्यू, म्युझिक अशी सगळी जंगी तयारी केली.

सोनम रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच आनंदने तिला त्याने हाताने लिहिलेले एक कार्ड गिफ्ट केले. सोनमसाठी हे सरप्राईज यादगार सरप्राईज ठरले. कारण यापूर्वी कुणीही कधीही तिच्यासाठी असे काही केले नव्हते.

सोनम व आनंद आज बॉलिवूडचे क्यूट कपल आहे. अगदी अलीकडे आनंद सर्वांसमोर सोनमच्या बुटाची लेट बांधत असतानाचे फोटो व्हायरल झाले होते.  नवरा असावा तर असा,अशी भावना हे फोटो पाहून उमटली होती.  आनंद हा एका दिल्लीचा मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. आनंद फॅशन ब्राँड इँंल्ली चा मालक आहे.  आनंदची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, तो प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश अहुजा यांचा नातू आहे. आनंदचे वषाकार्ठीचे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे. आनंदला फिरण्याशिवाय शूज आणि कारची आवड आहे.

टॅग्स :सोनम कपूर