Join us  

दहा वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत...! सोनम कपूरने बहिणीबद्दल केला मोठ्ठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 12:02 PM

  अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर ही निर्माता करण बुलानी याला दीर्घकाळापासून डेट करतेय, असे मानले जात होते. आता रियाची बहीण सोनम कपूर हिने स्वत: रियाच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे.

ठळक मुद्दे काही महिन्यांपूर्वी अनिल कपूरने रियाच्या कथित बॉयफ्रेन्डची भेट घेतली होती. मुंबईच्या एका रेस्टॉरंटबाहेर त्यांना पाहिले गेले होते. या फॅमिली डिनरचे फोटोही व्हायरल झाले होते.

अनिल कपूरची मोठी मुलगी सोनम कपूर गतवर्षी लग्नबंधनात अडकली. सोनमनंतर अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर ही सुद्धा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा ब-याच दिवसांपासून रंगतेय.  निर्माता करण बुलानी याला दीर्घकाळापासून रिया डेट करतेय, असे मानले जात होते. आता रियाची बहीण सोनम कपूर हिने स्वत: रियाच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे. होय, रिया व करण एकमेकांना डेट करत आहेत. आत्ता नाही तर गेल्या दहा वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. रिया व करण लग्न करणार असतील, तर त्यांच्या लग्नाची बातमी तुमच्याशी शेअर करताना मला अतिशय आनंद होईल. पण यंदा तरी त्यांचा लग्नाचा विचार नाही, असे सोनमने ताज्या मुलाखतीत सांगितले.

 काही महिन्यांपूर्वी अनिल कपूरने रियाच्या कथित बॉयफ्रेन्डची भेट घेतली होती. मुंबईच्या एका रेस्टॉरंटबाहेर त्यांना पाहिले गेले होते. या फॅमिली डिनरचे फोटोही व्हायरल झाले होते. अनेकदा करण अनिल कपूरच्या फॅमिली फंक्शनमध्ये दिसला आहे. करण हा क्रिएटीव्ह प्रोड्यूसर आणि नेटफ्लिक्स सीरिजचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आहे .  आयशा आणि वेक अप सिड  या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले आहे.अलीकडे त्याने द आॅडिशन  ही शॉर्ट फिल्म त्याने दिग्दर्शित केली होती. अनेक टीव्ही शोच्या प्रॉडक्शन टीममध्ये त्याने काम केले आहे. तर रिया एक फॅशन डिझाईनर. निमार्ती अशीही तिची ओळख आहे.

सोनमच्या लग्नात रिया व करणचे नाते पहिल्यांदा जगाच्या नजरेत आले. यादरम्यान करणने रियासोबतचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता. याच्या कॅप्शनमध्ये ‘माय गर्ल’ असे त्याने लिहिले होते. त्यापूर्वी फॅशन डिझाईनर संदीप खोसला व अबु जानीच्या भाचीच्या लग्नात दोघांनाही एकत्र पाहिले गेले होते.केवळ इतकेच नाही तर अनिल कपूरचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नातही करण सहभागी झाला होता. याशिवाय रियाची आई सुनीता कपूर हिच्या लंडनमधील बर्थ डे सेलिब्रेशनवेळीही तो रियासोबत होता.

टॅग्स :सोनम कपूरअनिल कपूर