Join us  

कोरोना काळात मंदिराच्या बाहेर बिस्किट वाटत होती अभिनेत्री, फोटो पाहून व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 1:45 PM

सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत अनेकजन मदतीचा हात पुढे करत आहेत. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी गरजुंना मदत करण्यासाठी थेट मैदानात उतर अन्न वाटप करत आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. मोजक्या कलाकारांनाच ते कसब उत्तमरित्या जमतं. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सोनल चौहान.

 

सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत अनेकजन मदतीचा हात पुढे करत आहेत. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी गरजुंना मदत करण्यासाठी थेट मैदानात उतर अन्न वाटप करत आहेत. त्यामुळे सोनल चौहानदेखील अशीच काही मदत करताना दिसत आहे. मंदिरा बाहेर असणा-या लहान मुलांना तिने बिस्कीटचे वाटप केले. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले. सोनलचे बिस्कीटाचे वाटप करताना पाहून नेटीझन्सने मात्र संताप केला आहे. युजर्स तिच्या या फोटोंवर संतप्त प्रतिक्रीया देत आहेत. एकीकडे युजर्स तिला ट्रोल करत असताना दुसरीकडे मात्र काहींनी तिचे कौतुकही केले आहे.  

सोनलचा हा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत तिला नेटीझन्स ट्रोल करत आहेत. इतर सेलिब्रेंटीप्राणे कोरोनाकाळातही चर्चेत राहण्यासासाठी सोनल आटापिटा करत असल्याची तिच्यावर टीका होत आहे.नुसते बिस्कीट वाटून काय त्यांचे पोट भरणार आहे. किमान एका वेळच्या जेवणाची तरी सोय करायला हवी होती नुसते बिस्किटं वाटून काय होणार आहे. 

‘जन्नत’मधून सोनलने बॉलिवूड डेब्यू केला़ पहिलाच सिनेमा हिट झाला. पण सोनलच्या करिअरला त्याचा फार काही फायदा झाला नाही. बॉलिवूड हवे तसे यश सोनलला मिळाले नाही. निवडक सिनेमा केल्यानंतर सोनलची करिअरची गाडी रुळावरुन घसरली.तिला सिनेमे मिळणे बंद झाल्यानंतर सोनलने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेमांकडे वळवला. अभिनयात तिला यश मिळाले नसले तरी मॉडेलिंग क्षेत्रात मात्र तिला चांगलेच यश मिळाले आहे.आजही अभिनय करत नसली तरी मॉडेलिंग करण्यात ती बिझी असते.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोनल नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपले हॉट फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या हटके फोटोमुंळे ती नेहमी चर्चेत असते. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो. लाईक्स आणि कमेंट्स देत चाहतेही पसंती देत असतात.

टॅग्स :सोनल चौहानमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस