Join us

सोनाक्षी... शत्रुघ्न सिन्हांचे चरित्र वाचणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 02:38 IST

                  आपल्या एका डायलॉगनेच सगळ््यांना खामोश करणाºया शत्रुघ्न सिन्हा यांचे चरित्र ...

                  आपल्या एका डायलॉगनेच सगळ््यांना खामोश करणाºया शत्रुघ्न सिन्हा यांचे चरित्र नूकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. एनिथिंग बट खामोश- शत्रुघ्न सिन्हा असे नाव असलेली त्यांची बायोग्राफी वाचण्यास खुद्द त्यांची मुलगी सोनाक्षीनेच नकार दिला आहे. यावेळी बोलताना सोनाक्षी म्हणाली 'मला पुस्तक वाचायची खूप भीती वाटतेय.' माझ्या वडिलांचे चरित्र वाचणार नाही तेवढी हिंमतच माझ्यात नाही. आपल्या आई-वडीलांच्या जीवनात अशा काही गोष्टी घडलेल्या असताता कि त्यांची माहिती मुलांना नसलेलीच बरी.                       या पुस्तकातील एका भागात शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेत्री रीना रॉय यांच्यातील पडद्यामागील केमिस्ट्रीबद्दल चर्चा केली आहे. पूनम यांच्यासोबत झालेल्या लग्नानंतरही शत्रुघ्न यांचे रीनाशी त्यांचे कसे संबंध राहिले होते त्याचीही चर्चा यात आहे. सोनाक्षी जरी हे चरित्र वाचणार नसली तरी शत्रुघ्न सिन्हांचे फॅन्स नक्कीच ते वाचण्यास उत्सुक असतील.