Join us  

​सैफ अली खानसोबत बोर्डिंग स्कूलमध्ये घडले होते असे काही... संपूर्ण रात्र काढली होती रडून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 5:40 AM

सैफ अली खान त्याचा लाडका मुलगा तैमूर मोठा झाल्यानंतर त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवणार आहे. वयाच्या तेराव्या वर्षी तैमूरला बोर्डिंग ...

सैफ अली खान त्याचा लाडका मुलगा तैमूर मोठा झाल्यानंतर त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवणार आहे. वयाच्या तेराव्या वर्षी तैमूरला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात येईल असे काही दिवसांपूर्वी सैफने स्पष्ट केले आहे. मीडियाशी बोलताना सैफने सांगितले होते की, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जी मुलं घरात राहून शिकू शकत नाहीत. त्या गोष्टी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकवल्या जातात. रायडिंग, आऊटडोर गेम्स अशा अनेक गोष्टी शिकल्यानंतर मुलं आपल्या पायावर उभी राहतात. सैफच्या मते मुलांसाठी एक चांगले वातावरण, शांतता आणि आपल्या वयाच्या दुसऱ्या मुलांची साथ गरजेची आहे. घरातल्या वातावरणापेक्षा चांगले वातावरण त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये मिळते. पतौडी घराण्यात विदेशात शिकणे ही नवी गोष्ट नाही. पतौडी कुटुंबातील प्रत्येकजण विदेशात शिकला आहे. सैफ अली खान सुद्धा वयाच्या नवव्या वर्षांपासून इंग्लडच्या एका प्रतिष्ठित बोर्डिंग स्कूलमध्ये शिकला आहे. या बोर्डिंग स्कूलमधील त्याची पहिली रात्र तो कधीच विसरू शकत नाही. त्याने पहिल्या रात्रीचा हा किस्सा हम साथ साथ है या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सांगितला होता. सैफ लहानपणापासूनच दिसायला खूपच छान होता. बोर्डिंगमध्ये गेल्यानंतर त्या बोर्डिंगमधील काही सिनियर मुले त्याच्याशी बोलायला आली. त्यातील एक मुलगा त्याला येऊन बोलला तू खूपच छान आहेस. आज तू माझ्यासोबतच झोप, हे ऐकून संपूर्ण रात्र सैफने रडून काढली होती. सैफने याविषयी सांगितले होते की, माझा एक सिनियर बोर्डिंगच्या पहिल्याच दिवशी येऊन मला म्हणाला की, तू खूपच चिकना आहेस. आज आपण दोघे एकाच बेडवर झोपूया... हे ऐकून मी रात्रभर रडलो होतो. माझ्यासोबत इथे काही वाईट तर घडणार नाही ना याची मला भीती वाटायला लागली होती. पण सकाळी मला कळले की, सगळ्या सिनियरने मिळून माझ्यासोबत प्रँक केला होता. सगळे माझी केवळ मजा करत आहे हे कळल्यावर मी खूपच खूश झालो होतो. Also Read : सैफ अली खानच्या हातात असलेल्या चिमुकलीला तुम्ही ओळखले का?