सोहाने सनीला मारली चपराक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:38 IST
एखाद्या कलाकारासाठी स्वत:ला विसरून भूमिका करणे हे महत्त्वाचे असते. पण, एवढही त्यात मग्न झाले तर ते कधीकधी घातक ठरू ...
सोहाने सनीला मारली चपराक
एखाद्या कलाकारासाठी स्वत:ला विसरून भूमिका करणे हे महत्त्वाचे असते. पण, एवढही त्यात मग्न झाले तर ते कधीकधी घातक ठरू शकते. असेच काहीसे सोहा अली खान हिच्याविषयी घडले. पण सनी देओल ला तिच्या या भूमिकेचा बळी ठरावे लागले. 'घायल वन्स अगेन' या घायल सिक्वेलच्या शूटिंगवेळी सेटवर एक किस्सा घडला. सोहाला सनी देओलच्या गालावर चपराक द्यायची अशी तिच्या भूमिकेची गरज होती. ती त्या भूमिकेत एवढी मग्न झाली की तिने खरंचच त्याच्या तोंडात चपराक दिली. तिने भावनेच्या भरात त्याच्या थोबाडीत दिली. सर्वजण तिथे उपस्थित होते आणि सर्वांनी तिचा हा रोष अनुभवला.