Join us  

पूजा हेगडेबरोबर सोहेल खानच्या लेकाने दिल्या पोझ, 'त्या' कृतीने वेधलं लक्ष; नेटकऱ्यांनी केली सलमानशी तुलना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 1:59 PM

सलमानचा पुतण्या निर्वाणचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूडमधील खान कुटुंबीय कायमच चर्चेत असतं. कोणत्या ना कोणत्या कारणाने बॉलिवूडचे खान चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. आता सलमान खानचा पुतण्या आणि सोहेल खानचा लेक निर्वाण खानची चर्चा रंगली आहे. निर्वाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्याची सलमानशी तुलना करत निर्वाणवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

अजित पवार गटाच्या बाबा सिद्दीकी आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्याकडून दरवर्षी रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं. त्यांच्या इफ्तार पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावतात. यंदाही सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी चार चांद लावले. या पार्टीत सलमान खान त्याच्या कुटुंबीयांसह उपस्थित होता. या पार्टीत सोहेल खानचा लेक निर्वाणही सहभागी झाला होता. इफ्तार पार्टीतली त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडेदेखील सहभागी झाली होती. या पार्टीत निर्वाणने पूजासह पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. यावेळी त्याने पूजाबरोबर केलेल्या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इन्स्टंट बॉलिवूडच्या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

या व्हिडिओत निर्वाण पूजाला स्पर्श न करता तिच्या पाठीमागे हाताची मूठ ठेवून उभा असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना सलमानची आठवण झाली. सलमानही अभिनेत्रींचा अशाच पद्धतीने आदर करताना दिसतो. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी निर्वाणवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. "भाचा कोणाचा आहे", "जेन्टलमॅन आहे" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :सलमान खानसोहेल खानसेलिब्रिटी