Join us  

​विरूष्काच्या हनीमूनच्या फोटोवर सोशल मीडियाचे चित्र-विचित्र प्रयोग, कधी मोदी तर कधी रणवीर! तुम्हीही पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 7:35 AM

अर्धा अधिक डिसेंबर महिना संपलाय. या महिन्यातील सगळ्यांत मोठ्या इव्हेंटची गोष्ट करायची झाल्यास, बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू ...

अर्धा अधिक डिसेंबर महिना संपलाय. या महिन्यातील सगळ्यांत मोठ्या इव्हेंटची गोष्ट करायची झाल्यास, बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या लग्नाला विसरून चालणार आहे. कदाचित त्याचमुळे देश आणि जगाच्या सोशल मीडियावर या लग्नाची चढलेली झिंग अजूनही उतरलेली नाहीय.सोशल मीडियावर विराट व अनुष्काचे लग्न अगदी लग्नाच्या दिवसापासून ट्रेंड करत आहेत. हे नवदांम्पत्य सध्या हनीमूनवर आहे. या हनीमूनवरचा एक ताजा फोटो अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत अनुष्का प्रचंड सुंदर दिसतेय. हा फोटो युरोपमधील असावा, असा अंदाज बांधला जात आहे. या फोटोचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य काय तर अनुष्काच्या हातावरची मेहंदी आणि तिच्या बोटातील वेडिंग रिंग. पण केवळ यावर लक्ष देईल तो सोशल मीडिया कुठला? होय, सोशल मीडियावर सध्या विरूष्काच्या या हनीमूनच्या फोटोवरचे जोक्स व्हायरल होत आहेत. फोटोशॉप्ड वापरून या फोटोसोबत असे काही चित्रविचित्र प्रयोग केले गेले आहेत की, ते पाहून कुणीही हसल्याशिवाय राहणार नाही.फोटो क्लिक करण्याची वेळ असेल आणि पीएम मोदींची आठवण होणार नाही, असे शक्यच नाही. त्याचमुळे टिष्ट्वटर युजर्सनी विराट व अनुष्काच्या मागे पीएम मोदींना उभे करून टाकले.तुम्हाला आठवत असेल तर आपला पहिला चित्रपट  ‘बँड बाजा बारात’मध्ये अनुष्काने रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर केली होती. दोघांच्या रोमान्सच्याही चर्चा उठल्या होत्या. कदाचित म्हणूनच विरूष्काच्या हनीमूनच्या फोटोत रणवीर हटकून आलाच.एका युजरने तर कमालच केली. याने चक्क विराटच्या जागी स्वत:लाच ठेवले आहे.काही युजर्सनी या हनीमूनला ‘प्युअर इंडियन मिडल क्लास प्रकारचे हनीमून’ म्हटले आहे.ALSO READ : ​अनुष्का शर्माच्या लग्नात ‘विराट’ खर्च! पाहुण्यांना दिले अनमोल गिफ्ट!! ११ नोव्हेंबरला अनुष्का आणि विराट यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. इटलीतल्या टस्कनी शहरात हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नानंतर दिल्ली व मुंबईत दोन वेगवेगळी रिसेप्शन होणार आहेत.