म्हणून श्रद्धा कपूरने नाकारली 'साहो'मधील भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 17:40 IST
प्रभाससोबत साहोमध्ये झकळण्यासाठी फिल्म मेकर्सची पहिली पसंती श्रद्धा कपूर होती. मात्र त्यानंतर त्यांना ही पसंती बदलल्याचे समजते आहे. याच्या ...
म्हणून श्रद्धा कपूरने नाकारली 'साहो'मधील भूमिका
प्रभाससोबत साहोमध्ये झकळण्यासाठी फिल्म मेकर्सची पहिली पसंती श्रद्धा कपूर होती. मात्र त्यानंतर त्यांना ही पसंती बदलल्याचे समजते आहे. याच्या मागचे कारण दुसरे तिसरे काही नसून श्रद्धाची फीस असल्याचे कळतंय. सूत्रांच्या माहितीनुसार साहोमध्ये काम करण्यासाठी श्रद्धाने 8 कोटींचे मानधन मागितले आणि निर्मात्यांनी ती अमान्य केली. ही गोष्ट खुद्द श्रद्धाने रिवील केली आहे. मला साहोची कथा आवडली होती. या चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा देखील होती. मात्र त्यांनी मला रिजेक्ट केले. कारण साऊथच्या चित्रपटांमध्ये ऐवढे मानधन कोणत्याही अभिनेत्रीला दिले जात नाही. साऊथच्या त्याच्या तुलनेत मी मागितलेले मानधन खूप जास्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. साहोमध्ये श्रद्धा कपूर बरोबरच दिशा पटानीचे नावही चर्चेत होते. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे तिच्यासोबत ही डील होऊ शकली नाही. शेवटी प्रभासची जोडी अनुष्का शेट्टीबरोबरच फायनल करण्यात आली. ALSO READ : UNBEARABLY HOT : ही आहे, ‘साहो’मधील प्रभासच्या नव्या लूकची एक झलक!साहोचा टीजर बाहुबली2 सोबतच रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस देखील उतरला आहे. नुकताच या चित्रपटातील प्रभासला लुक रिव्हिल करण्यात आला. आधी या चित्रपटातून जास्त वजनामुळे अनुष्काला डच्चू देण्यात आला होता. मात्र आता अनुष्कालाच साहोमध्ये घेण्यात आले आहे. प्रभास आणि अनुष्काची केमिस्ट्री याआधी प्रेक्षकांनी 'बाहुबली2' मध्ये पाहिली आहे. या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेमसुद्धा मिळाले. ऑगस्ट महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास 150 कोटींच्या आसपास आहे. यात नील नितिन मुकेश एका नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.