Join us  

अबब..! प्रभासच्या 'सालार'मधील क्लायमॅक्स सीनसाठी खर्च केले जाणार इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 8:37 AM

Prabhas : अभिनेता प्रभासच्या 'सालार' (Salaar) चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन खूप वेगळा बनवण्याची योजना निर्मात्यांनी आखली आहे.

बहुचर्चित चित्रपट केजीएफ २ (KGF Chapter 2) चं दिग्दर्शक प्रशांत नील (Prashant Neel) बाहुबली फेम प्रभास(Prabhas)च्या सालार(Salaar)साठी एक मोठा क्लायमॅक्स सीन शूट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे, पण नेमकी तारीख अजून जाहीर झालेली नाही. KGF Chapter 2 हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. १२०० कोटींहून जास्त कलेक्शन करणाऱ्या यशच्या या चित्रपटानं केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही अतिशय चांगली कामगिरी केली. दिग्दर्शक प्रशांत नील ज्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे त्याच्याच खांद्यावर प्रभासच्या सालारच्या चित्रपटाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पॅन-इंडिया स्टार प्रभास सध्या मोठ्या बजेटच्या तेलगू चित्रपटांसाठी पहिली पसंती बनला आहे. जरी त्याचा शेवटचा चित्रपट राधे श्यामला फारसे यश मिळाले नसले तरी, होंबळे फिल्म्सच्या त्याच्या आगामी चित्रपटाकडून खूप आशा आहेत. प्रशांत नील सालार बनवत आहे, ज्यामध्ये अनेक अॅक्शन सीक्वेन्सवर जास्त भर दिला जाण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्स अॅक्शन सीक्वेन्स हे या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण असेल.

सालारचा क्लायमॅक्स खूप वेगळा बनवण्याची योजना निर्मात्यांनी आखली आहे. रिपोर्ट्सनुसार, क्लायमॅक्स सीन प्रभासच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सीन असेल. चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे १८ मे रोजी ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, क्रू प्रचंड अॅक्शन सीक्वेन्सची तयारी करताना दिसले होते. क्लायमॅक्स सीनसह, निर्मात्यांनी समुद्राच्या मध्यभागी एक अॅक्शन सीन देखील शूट केला आहे. ते या चित्रपटावर बक्कळ पैसा खर्च करत आहेत. अॅक्शन सीक्वेन्स २० मिनिटांचा असून या सीनचे बजेट सुमारे १० कोटी रुपये आहेत.

याबद्दल निर्माते विजय किरगंदूर म्हणाले, प्रत्येक महिन्यात आम्ही प्रभाससोबत १० ते १५ दिवस शूटिंग करणार आहोत आणि कदाचित त्याच्याशिवाय एक आठवडाही. वर्षाखेरीस शूटिंग पूर्ण करण्याचा आमचा विचार आहे. हा अॅक्शन चित्रपट आहे. प्रभासच्या चाहत्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.”

सालार या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन मुख्य भूमिकेत आहे. जगपती बाबू, ईईेश्वरी राव आणि पृथ्वीराज सुकुमारन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :प्रभासकेजीएफ