Join us  

पत्नीसह ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसला अक्षय कुमार, फोटो प्रचंड होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 6:00 AM

अक्षय कुमारने पत्नी ट्विंकलसारखाच ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोत दोघेही मजेशीर अंदाजात पाहायला मिळतायेत.

खिलाडी अक्षय कुमार सोशल मीडियावरही बराच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या फॅन्सशी संवाद साधत असतो. शिवाय फोटो आणि व्हिडिओसुद्धा तो शेअर करतो. नुकताच त्याने शेअर केलेला फोटो फॅन्सच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.

 

यांत अक्षयने पत्नी ट्विंकलसारखाच ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोत दोघेही मजेशीर अंदाजात पाहायला मिळतायेत. हा फोटो शेअर करत ट्विंकलने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.

वैयक्तीक जीवनातही अक्षय एक उत्तम आणि आदर्श पती आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्नासह त्याचा सुखी संसार सुरु आहे. या दोघांची लव्हस्टोरी सिनेमाला साजेल अशीच रंजक आहे.  दोघांचंही एकमेंकांवर जीवापाड प्रेम आहे. मात्र दोघांचं हे नातं निर्माण होण्याआधी त्याला अक्षय कुमारची सासू आणि प्रसिद्ध अभिनेत्री  डिंपल कपाडिया यांनी विरोध केला होता. या विरोधाचं कारण ऐकून  तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या कारणाचा खुलासा खुद्द अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने केला होता.

अक्षय कुमार आणि ट्विंकलचे एकमेंकांवर जीवापाड प्रेम होतं. दोघंही लग्नाच्या तयारीत होते. ही बाब ट्विंकलने आपली आई डिंपलला सांगितली. मात्र डिंपलचा या लग्नाला सुरुवातीला विरोध होता. अक्षय कुमार गे अर्थात समलैंगिक असल्याचा डिंपलला संशय होता. ट्विंकलने आपल्या आईला म्हणजेच डिंपलला बरंच समजावण्याचा प्रयत्न केला. 

मात्र डिंपल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ही सगळी बाब ट्विंकलच्या वडिलांना म्हणजेच सुपरस्टार राजेश खन्ना यांनी समजली. या सगळ्या तिढ्यात त्यांनी मधस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावर तोडगा म्हणून राजेश खन्ना यांनी अक्षय आणि ट्विंकल यांना लग्नाआधी वर्षभर एकत्र राहण्याचा सल्ला दिला. यानंतर अक्षय आणि ट्विंकल वर्षभर एकत्र राहिले.

त्यानंतर डिंपलला खात्री पटली की अक्षय कुमार गे नाही आणि लेकीचं लग्न त्यांनी खिलाडी कुमारशी मोठ्या आनंदात लावून दिलं. दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहर आणि ट्विंकल एकत्र कॉलेजमध्ये होते. त्यामुळे करणचं ट्विंकलवर प्रेम होतं. मात्र अक्षयच्या एंट्रीमुळे करणचंही हार्टब्रेक झालं.  

टॅग्स :अक्षय कुमारट्विंकल खन्ना