Join us

म्हणून नवाजुद्दीनने घेतला हा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 11:38 IST

काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्धीकी आपले जीवनचरित्र ‘अ‍ॅन आॅर्डिनरी लाईफ'च्या निमित्ताने फार चर्चेत राहिला आहे, ह्या त्याच्या  जीवनचरित्रने अनेक रहस्य ...

काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्धीकी आपले जीवनचरित्र ‘अ‍ॅन आॅर्डिनरी लाईफ'च्या निमित्ताने फार चर्चेत राहिला आहे, ह्या त्याच्या  जीवनचरित्रने अनेक रहस्य उलगण्याच्या नादात नावजुद्दीन ने आपले काही स्त्रीयांबरोबर असलेले संबंध  हे सुद्धा सांगितले हा वाद एवढा वाढला की नवाजुद्दीनच्या विरोधात महिला आयोगने तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे नवाजुद्दीनने सोशल मीडियावर माफी मागून या पुस्तकाचे प्रकाशन मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.नवाजुद्दीनने सोशल मीडियावर म्हणजेच ट्वीटर असे म्हटले "मी सगळ्यांची माफी मागू इच्छितो ज्यांना माझ्या पुस्तकामुळे आणि त्यातील मजकुरामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मी माझ्या पुस्तकाचे प्रकाशन थांबवत आहे' नवाजुद्दीनने त्याच्या पुस्तकात मिस लव्हली चित्रपटातील त्याची को स्टार निहारिका सिह आणि थिएटर आर्टिस्ट सुनीता राजवर ह्याच्याशी संबंध असल्याचे लिहिले होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी चर्चेचा विषय बनली. निहारिका बद्दल सांगताना नावजुद्दीन ने लिहले आहे आहे की "निहारिका अशी माझ्याशी फार फ्रेंडली वागायची नंतर तिच्या अंदाजात मला फरक जाणवू लागला त्यानंतर आम्ही फिल्म चा डान्स सिक्वेन्स सुद्धा शूट केला त्यावेळेस ती माझ्या पासून लांब लांब राहत होती जेव्हा मी तिला ह्या बद्दल विचारले तेव्हा तिने काहीच नाही सांगितले एकदा मी तिला माझ्या घरी जेवायला बोलावले तिला जेवण खूप आवडले त्याचदिवशी तिने सुद्धा मला तिच्या घरी बोलावले जेव्हा मी तिच्या घरी गेलो तेव्हा तिने तिच्या घर मेणबत्यांनी सजवले होते त्यात ती फार सुंदर दिसत होती. त्यानंतर आमचे नाते पुढे दीड वर्ष चालले'. ह्यावर निहारिका सिह ने उत्तर देताना म्हटली की 'नवाजुद्दीन ने माझ्यापासून एक गोष्ट लपवली की तो विवाहित आहे आणि त्याची पत्नी गावात राहते हेच कारण होते की मी नवाजुद्दीनबरोबर असलेली सगळी नाती तोडली' त्याचबरोबर नवाजुद्दीन बद्दल बोलताना सुनीता राजवर म्हणाली की नवाज आमच्या पर्सनल गोष्टी आपल्या मित्रासोबत शेअर करायचा आणि त्याची खिल्ली उडवायचा त्यामुळे मी त्याच्या पासून दूर राहणे पसंद केले आणि त्याला सोडून दिले.