Join us  

एका नाटकाचे 50 रूपये घेणारे नाना पाटेकर ‘या’ अभिनेत्रीमुळे एका रात्रीत झाले स्टार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 5:46 PM

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी नाना पाटेकर थिएटर आर्टीस्ट होते. प्रत्येक शोमध्ये त्यांना 50 रुपये मिळायचे....

ठळक मुद्दे शाळेच्या दिवसांपासून नाना नाटकात काम करत असत. त्यानंतर अप्लाइड आर्टची डीग्री घेतल्यावर त्यांनी एका जाहिरात एजन्सीमध्ये काम सुरु केले

नाना पाटेकर ( Nana Patekar) या हरहुन्नरी अभिनेत्याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. नानांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या. किंबहुना अजरामर झाल्यात. आज नाना बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात. पण इथपर्यंतचा त्यांचा प्रवास खचितच सोपा नव्हता. नानाच्या रूपात चित्रपटसृष्टीला एक अनमोल हिरा लाभला. पण हा हिरा शोधला तो एका अभिनेत्रीने. होय, या अभिनेत्रीचे नाव स्मिता पाटील (Smita Patil ).

नानांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वयाच्या 13 वर्षी नानांच्या आयुष्यात एक वादळ आले आणि या वादळाने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलवून टाकले.  वडीलांचा टेक्साटाइल पेंटिंगचा एक छोटासा व्यवसाय होता. नाना 13 वर्षांचे असताना  वडिलांच्या एका जवळच्या नातेवाईकाने त्यांची सर्व संपत्ती बळकावली आणि नानाचे अख्खे कुटुंब रस्त्यावर आलोत. तो सगळ्यांसाठीच प्रचंड मोठा धक्का होता. इतका मोठा की, नानांनी वयाच्या 13 वषापार्सूनच काम करायला सुरुवात केली होती. शाळा संपल्यावर नाना 8 किलोमीटर दूर चुनाभट्टीला जाऊन सिनेमांचे पोस्टर पेंट करायचे़ या पैशातून त्यांना दोन वेळचे जेवण मिळत असे. त्यावेळी त्यांना 35 रुपये महिना मिळायचा.

 शाळेच्या दिवसांपासून नाना नाटकात काम करत असत. त्यानंतर अप्लाइड आर्टची डीग्री घेतल्यावर त्यांनी एका जाहिरात एजन्सीमध्ये काम सुरु केले. पण त्यांना सिनेमात आणले ते स्मिता पाटील यांनी.  चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी नाना पाटेकर थिएटर आर्टीस्ट होते. प्रत्येक शोमध्ये त्यांना 50 रुपये मिळायचे. एकदा त्यांचे एक नाटक प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील पाहायला आल्या. स्मिता पाटील नानांच्या अभिनयावर खूप प्रभावित झाल्या आणि त्यांनी नानांना बॉलिवूडमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. 

एकदिवस नाही म्हणत असतानाही स्मिता पाटील यांनी नानांना रवी चोप्रा यांच्याकडे नेले. तो सिनेमा होता ‘आज की आवाज’. या चित्रपटात नानांना एका बलात्का-याची निगेटीव्ह भूमिका दिली गेली. शेवटी याच भूमिकेने नानांना प्रसिद्धी मिळाली आणि नानांचा बॉलिवूड प्रवास सुरू झाला.  

टॅग्स :नाना पाटेकरस्मिता पाटील