झोपलेल्या अवस्थेतील फोटो शेअर केल्याने निधी अग्रवालवर युजर्सनी साधला निशाणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 18:58 IST
‘झोपलेल्या अवस्थेत कोणी फोटो काढत असते काय?’ असा प्रतिप्रश्न करीत युजर्सनी निधी अग्रवालला ट्रोल केले. वाचा नेमके काय आहे प्रकरण !
झोपलेल्या अवस्थेतील फोटो शेअर केल्याने निधी अग्रवालवर युजर्सनी साधला निशाणा!
‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून अभिनेता टायगर श्रॉफसोबत आपल्या करिअरची सुरुवात करणारी निधी अग्रवाल सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे. होय, निधी तिच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली असून, तिचा हा फोटो युजर्सना फारसा पसंत आला नसल्याचे दिसत आहे. कारण युजर्सनी निधीवर निशाना साधताना तिच्या या फोटोला खूपच उलट-सुलट कॉमेण्ट दिल्या आहेत. वास्तविक निधीने झोपलेल्या अवस्थेतील तिचा एक फोटो सोशल अकाउंटवर शेअर केला. थ्रोबॅक लिहून शेअर केलेल्या या फोटोची काहींने कौतुक केले तर काहींनी तिच्यावर उलटसुलट कॉमेण्ट केल्या. युजर्सच्या विचित्र कॉमेण्ट वाचून निधीचे काही चाहते तिच्या बचावासाठी पुढे आले. मात्र सोशल मीडियावर एखाद्याला आवर घालणे म्हणावे तेवढे सोपे नाही. कारण युजर्सचे तोंड बंद करणे हे स्वत: निधीलाही शक्य झाले नसते. त्यामुळेच अजूनही निधीच्या या फोटो कॉमेण्टचा सिलसिला सुरूच आहे. वास्तविक निधी पहिलीच ट्रोल झालेली अभिनेत्री नाही. यापूर्वीदेखील दीपिका पादुकोण, दिशा पटानी, ईशा गुप्ता यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. निधीने जो फोटो शेअर केला आहे, तो तिच्या एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. जेव्हा निधीने हा फोटो शेअर केला तेव्हा तिने स्पष्ट केले होते की, हा फोटो सेटवरचा आहे. अशातही युजर्सनी ‘झोपताना कोणी फोटो काढत असते काय?’ असे म्हणत तिची खिल्ली उडविली. तिच्या चाहत्यांनी अशाप्रकारच्या अभद्र कॉमेण्ट करणाºयांना समजाविण्याचा प्रयत्न केला, परंतु ऐकतील ते युजर्स कसले? असेच काहीसे पहावयास मिळाले. दरम्यान, निधीचा डेब्यू चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा यशस्वी ठरला नव्हता. परंतु तिचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. सध्या निधी तिच्या आगामी काळातील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.