अलीकडे एका मुलाखतीत क्रिती बोलली. को-स्टारसोबत मैत्री होणे, त्याच्यासोबत डिनरला वा मुव्हीला जाणे, यात मला गैर वाटत नाही. लोक तुमच्याबद्दल ना-ना तºहेच्या चर्चा करतात, म्हणून मी माझ्या मित्रांसोबत बाहेर जाणे थांबवू शकत नाही. मी प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तरे देत बसणार नाही. मी माझ्या मित्रांसोबत फिरेल, मज्जा करेल. मग लोकांना काहीही बोलू देते. राहिली गोष्ट सुशांतची तर, लोक त्याच्या व माझ्याबद्दल काय बोलतात, यावर माझा काहीही कंट्रोल नाही. मी याबद्दल बराच खुलासा केला आहे, असे क्रिती म्हणाली.
मी रोमॅन्टिक मुलगी आहे. कदाचित सर्वच मुलींसारखी रोमॅन्टिक आहे. एक्सपेन्सिव्ह डेटवर जाण्यापेक्षा पायजामा घालून मस्तपैकी टीव्हीवर एखादा चित्रपट बघावा किंवा बीचवर फिरत सुटावे, हे मला अधिक आवडते. त्यामुळे मी फार हाय मेंटेनन्स गर्लफ्रेन्ड नाही, असे क्रिती म्हणाली. आता क्रिती हे म्हणतेय, म्हटल्यावर विश्वास ठेवायलाच हवा. होय ना?