साऊथ चित्रपटांची सेक्सी सायरन म्हणून ओळखली जाणारी सिल्क स्मिता आज जरी या जगात नसली तरी, तिच्या लूक आणि सेक्सी अवतारामुळे आजही ती प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सिल्क स्मिताचे खरे नाव विजयालक्ष्मी होते. लोक तिचे बी-ग्रेड सिनेमा पाहण्यासाठी अक्षरशः तासन तास रांगा लावायचे. जिवंतपणी सिल्क स्मिताला जो सन्मान मिळायला हवा होता तो कधीच मिळाला नाही. चौथी पर्यंतच ती शिक्षण घेवू शकली. फार हलाखीचे जगणं ती जगत होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे सिल्कने अगदी लहान वयात काम करायला सुरुवात केली होती. मात्र घरच्यांच्या जाचाला कंटाळून सिल्कने घरही सोडले आणि एक मेकअप आर्टिस्ट म्हणूनही इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली.
सिल्कचा मृत्यू कसा झाला या विषयी आजही गुढ कायमच आहे. सिल्क स्मिताने आत्महत्या करीत या जगाचा निरोप घेतला. तिच्या या अचानक आलेल्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण साऊथ इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, अजूनही तिच्या आत्महत्येचे कारण कोणालाही समजू शकले नाही. सिल्क चित्रपटात काम करायला लागल्यानंतर तिला काहीच काळात चांगल्या संधी मिळू लागल्या होत्या. प्रकाशझोतात येत असताना तिने तिच्या नावात बदल करून 'लक्ष्मी' ऐवजी 'सिल्क स्मिता' ठेवले. अभिनय क्षेत्रात 'लक्ष्मी' ही सिल्क स्मिता म्हणून ओळखली जावू लागली. नंतर अनेक अ़डल्ट सिनेमात ती झळकली. तिची लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या तिच्यापुढे रांगा लागायच्या. सिल्कने त्यांच्या सिनेमात काम करावे अशी प्रत्येक निर्मात्याची इच्छा असायची.
सिल्कने तिच्या कारकिर्दीत खूप काम केले, पैसा, प्रसिद्धी तिने मिळवली. निर्माती म्हणूनही ती सिनेमात पैसे गुंतवायची. मात्र तिला त्यात फारसे यश मिळाले नाही. निर्माती बनल्यानंतर तिला प्रचंड तोटाही सहन करावा लागला. याच गोष्टीचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाला आणि ती मानसिकदृष्ट्या खचली गेली. 1979 मध्ये 'इनाये थेडी' मल्याळम चित्रपटात प्रथमचच लोकांनी तिला पडद्यावर पाहिले होते. स्मिताच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून चाहतेही फुल ऑन फिदा व्हायचे. दहा वर्षांच्या करिअरमध्ये तिने सुमारे 500 सिनेमात काम केले होते.