Join us  

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीचा 'शेरशाह' चित्रपट येणार या दिवशी भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 5:12 PM

'शेरशहा' ही शौर्य, प्रेम आणि त्यागाची कहाणी आहे.

अमेझॉन प्राईम व्हिडीओतर्फे अमेझॉन ओरिजिनल चित्रपट ‘शेरशाह’ या चित्रपटाच्या प्रीमिअरची आज घोषणा करण्यात आली. या निमित्ताने जागतिक पातळीवरील प्रीमिअरसाठी प्रथमच अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि धर्मा प्रोडक्शन्स एकत्र आले आहेत. कारगीलमध्ये पराक्रम केलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनपटावरून प्रेरणा घेत निर्मिती करण्यात आलेल्या या युद्धनाट्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

विष्णू वर्धन यांचे दिग्दर्शन आणि धर्मा प्रोडक्शन्स व काश एंटरटेनेमेंट यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘शेरशाह’ हा बॉलीवूडचा या वर्षातील सर्वात मोठा युद्ध नाट्य चित्रपट असेल आणि हा रोमांचक चित्रपट १२ ऑगस्टला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत आणि शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 

शेरशहा ही शौर्य, प्रेम आणि त्यागाची कहाणी आहे. कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या जीवनपटावरून प्रेरणा घेत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या पराक्रमाची गाथा उलगडण्यात आली असून १९९९ सालातील कारगीलच्या युद्धात त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना देण्यात येत आहे.

आपले ‘शेरशाह’ हे नाव सार्थ करत कॅप्टन बत्रा यांनी दिलेला साहसी लढा आणि सरतेशेवटी केलेले बलिदान भारताच्या विजयामध्ये महत्त्वाचे ठरले होते.शेरशाह चित्रपट १२ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणीकरण जोहर