Join us  

सैफच्या लेकाला सोडून 'या' अभिनेत्याला डेट करतीये पलक तिवारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 11:56 AM

Palak tiwari: पलक आणि इब्राहिम यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं त्यामुळे या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, पलकने या चर्चांवर मौन सोडलं.

सध्याच्या काळात अनेक स्टार किड्स नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे पलक तिवारी (palak tiwari). अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक गेल्या (shweta tiwari daughter) काही काळापासून सातत्याने चर्चेत येत आहे. अनेकदा ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत येणारी पलक सध्या तिच्या लव्हलाइफमुळे चर्चेत येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पलक अभिनेता सैफ अली खानचा (saif ali khan) लेक इब्राहिम अली खान पतौडीला (ibrahim ali khan) डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आता पलक इब्राहिम नव्हे तर एका अभिनेत्याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

पलक आणि इब्राहिम यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं त्यामुळे या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, पलकने या चर्चांवर मौन सोडलं. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत असं तिने सांगितलं.परंतु, आता पलक 'द आर्चीज'फेम अभिनेता वेदांग रैना  (vedang raina) याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

'पिंकव्हिला'च्या वृत्तानुसार, पलक आणि वेदांग गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा काही प्रायव्हेट पार्टीमध्ये या दोघांनी एकत्र हजेरी लावली आहे. परंतु, अद्यापही या दोघांनी या नात्यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही.

पलक आणि वेदांग यांची भेट टॅलेंट एजन्सीने आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली होती. दोघंही एकाच टॅलेंट एजन्सीचा भाग आहेत. विशेष म्हणजे वेदांग व पलक यांच्या नात्याविषयी श्वेताला माहित असून तिची परवानगी आहे. परंतु, पलक आणि वेदांगच्या नात्याविषयीदेखील अफवा असल्याचं पलकच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. 

दरम्यान, पलक लवकरच विवेक ओबेरॉयच्या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत निर्मिती होत असलेल्या 'रोजी: द सॅफरन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं. 

टॅग्स :पलक तिवारीश्वेता तिवारीसैफ अली खान इब्राहिम अली खानसेलिब्रिटीबॉलिवूड