Join us

श्वेता आणि मी एकमेकांसाठी बनलोच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:26 IST

अभिनेत्री यामी गौतमसोबत मैत्रीची चर्चा चांगलीच रंगत असताना अभिनेता पुलकित सम्राटने अखेर मौन सोडले आहे. पत्नी श्वेता रोहिरा आणि ...

अभिनेत्री यामी गौतमसोबत मैत्रीची चर्चा चांगलीच रंगत असताना अभिनेता पुलकित सम्राटने अखेर मौन सोडले आहे. पत्नी श्वेता रोहिरा आणि मी एकमेकांसाठी बनलेलो नव्हतो. त्यामुळे आमचे संबंध टिकू शकले नाहीत, असे वक्तव्य त्याने नुकतेच केले आहे. पुलकित हा सध्या ३२ वर्षांचा आहे. सुपरस्टार सलमानखानची मानलेली बहीण श्वेतासोबत २०१४मध्ये त्याने विवाह केला होता. मागील वर्षी त्यांच्यात काही तरी बिनसले आणि ते दोघे वेगळे झाले. दुसरीकडे ‘सनम रे’ मधील त्याची सहकारी यामीसोबत त्याची मैत्री वाढत आहे. श्वेता आणि माझ्यात पटले नसेल तर त्याला ती आणि मी दोघेही तेवढेच जबाबदार आहोत. संबंध बिनसण्यामागे कुणी तिसरी व्यक्ती आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. यामीवर या बाबतीत आरोप करणे म्हणजे तिला यशापासून मागे ओढण्याचा प्रकार होय. खरे तर यामुळे ती आणखी कणखर बनली आहे. दिव्या खोसला दिग्दर्शित  ‘सनम रे’ हा चित्रपट १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. यात ही जोडी दिसणार आहे.