Join us

युवी-हेजलचे पुढील वर्षी शुभमंगल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 22:45 IST

युवराज सिंग आणि हेजल कीच यांनी गुपचुप बाली येथे दिवाळीच्या वेळेस साखरपुडा करून घेतला. युवराजचे आईवडील त्यादोघांविषयी अत्यंत खुश ...

युवराज सिंग आणि हेजल कीच यांनी गुपचुप बाली येथे दिवाळीच्या वेळेस साखरपुडा करून घेतला. युवराजचे आईवडील त्यादोघांविषयी अत्यंत खुश आहेत. युवी आणि हेजल पुढील वर्षी फे ब्रुवारीत लग्नाच्या नाजुक बंधनात अडकणार आहेत.  फतेबढ साहीब जवळील संत राम सिंघजी गंडुअन वाले यांच्या दुफेरा साहिब येथे क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची गर्लफ्रेंड हेजल कीच यांनी बाली येथे साखरपुडा करून घेतला. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात असून लवकरच लग्नही करणार असल्याचे कळाले आहे.आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी युवीने त्याची होणारी पत्नी हेजल आणि त्याच्या आईचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याला कॅन्सर झाला त्यावेळी त्याची सर्वांत मोठी शक्ती म्हणजे त्याची आई होती. त्याची आई शबनम सिंग म्हणते,‘फायनली युवीला त्याची योग्य साथीदार मिळालीच. कारण तो म्हणाला होता की, जोपर्यंत मला योग्य पार्टनर मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. मी देखील हेजलच्या आईवडीलांना भेटले. ते दोघे खुप चांगले आहेत.’