Join us  

घराचे हप्ते थकले, आई-वडिलही मदतीसाठी नाहीत, कोरोनामुळे कमल हसनची लेक श्रृती हसनचीही झालीय बिकट अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 12:36 PM

कमल हासनच्या मुलीला पैस्यांची काय कमी असे प्रत्येकाला वाटत असेल मात्र दिसते तसे नसते असेच काहीसे श्रृती हासनसवरुन स्पष्ट होते. कोरोनामुळे तिलाही प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांचं आयुष्य ऐशोआरामाचं असतं. त्यांची जीवनशैली फारच उच्च असते असं आपण पाहतो. मात्र त्यालाही कधी कधी आर्थिक संकाटाला समाेरे जावे लागते. कोरोनाकाळाता अनेक उद्योगधंद्याप्रमाणे मनोरंजन क्षेत्राचेही प्रचंड नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना सेलिब्रेटी देखील बेहाल झाले आहेत. 

अशात सर्वात धक्कादायक म्हणजे अभिनेत्री श्रृती हासनदेखील  लॉकडाऊनमुळे त्रस्त झाल्याचे समोर आले आहे. श्रती हासनने आजवर मोजकेच सिनेमा केले असले तरी ती कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे. एका सिनेमात काम करण्यासाठी श्रृती गलेलठ्ठ मानधन घेते. मॉडेलिंग आणि सिनेमा तिचं कमाईचं साधन असून यातून ती आपला उदरनिर्वाह चालवते. मात्र सध्या शूटिंग बंद असल्यामुळे घरात बसण्याशिवाय पर्याय नाही. 

हे वाचून  कमल हासनच्या मुलीला पैस्यांची काय कमी असे प्रत्येकाला वाटत असेल मात्र दिसते तसे नसते असेच काहीसे श्रृती हासनसवरुन स्पष्ट होते. कोरोनामुळे तिलाही प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचे संकट असले तरी शूटिंग करण्यासाठी ती तयार असल्याचे तिने म्हटले आहे.

श्रृती हासनने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिची लॉकडाऊन व्यथा मांडली आहे. लॉकडाऊनमुळे कामही नसल्याने आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे तिने म्हटले आहे. अशात घराचा EMI तरी कसा भरायचा याची चिंता सध्या तिला सतावत आहे.  माझी मदत करण्यासाठी माझे आई-वडिलही माझ्याजवळ नाहीत.

शूटिंग सेटवर विना मास्क राहणे खरंच खूप भीतीदायक असले तरीही मला पुन्हा एकदा कामाला सुरुवात करायची आहे. माझ्यासारखे कित्येकांना आज पैस्यांची गरज आहे. अनेक कुटंबाचा उरदर्निवाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, खरंच हे खूप चिंताजनक आणि तितकेच त्रासदायक असल्याचे तिने म्हटले आहे.

मध्यंतरी ‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत श्रुती हासनने फिल्मी स्टार्सच्या या वागण्याची निंदा केली होती. त्यांची सुट्टी शानदार होती, हे ऐकून आनंद वाटतो. सुट्टी एन्जॉय करणे हा त्यांचा हक्क आहे. पण व्यक्तिश: माझे मत विचाराल तर मास्क काढून पूलमध्ये उतरण्याची ही वेळ नाही. हा कठीण काळ आहे. काही लोकांसाठी तर खूपच कठीण. सगळं काही सहज मिळतंय, या प्रीव्हिलेजसाठी आभार व्यक्त करणे गरजेचे आहे. पण हे प्रीव्हिलेज अशाप्रकारे लोकांच्या तोंडावर मारणे योग्य नाही. दिखावा करण्याची गरज नाही, असे श्रुती या मुलाखतीत म्हणाली.

टॅग्स :कमल हासनश्रुती हसन