श्रद्धा कपूर की परिणीती चोप्रा? कबीर खानच्या वेब सीरिजमध्ये कुणाची लागणार वर्णी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 14:37 IST
दिग्दर्शक कबीर खान आता ‘वेब दुनियेत’ पाऊल ठेवणार आहे. होय, म्हणजेच कबीर खान एक वेब सीरिज घेऊन येतो आहे. ...
श्रद्धा कपूर की परिणीती चोप्रा? कबीर खानच्या वेब सीरिजमध्ये कुणाची लागणार वर्णी?
दिग्दर्शक कबीर खान आता ‘वेब दुनियेत’ पाऊल ठेवणार आहे. होय, म्हणजेच कबीर खान एक वेब सीरिज घेऊन येतो आहे. ‘फॉरगॉटन आर्मी’ असे शीर्षक असलेल्या या वेब सीरिजमध्ये आझाद हिंद फौजेची कथा असणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी उभारलेल्या या सेनेतील जवानांची कथा यात पाहायला मिळणार आहे. सहा ते आठ एपिसोडच्या या वेब सीरिजचा प्रत्येक भाग जवळपास ४० मिनिटांचा असणार आहे. म्हणजेच दोन चित्रपटांच्या बरोबरीचा. त्यामुळे कबीर खान यांच्या या वेब सीरिजबद्दल सगळेच उत्सूक आहेत. या वेबसीरिजबद्दल आता एक नवी बातमी आली आहे. होय, यात सैफ अली खान व श्रद्धा कपूर या दोघांची वर्णी लागणार असल्याची खबर आहे. अर्थात सैफ अली खान या वेब सीरिजमध्ये दिसणार, ही बातमी स्वत: कबीर खान यानेच धुडकावून लावली आहे. ही केवळ एक अफवा आहे, असे कबीर म्हणाला.सैफचा पत्ता असा कट झाल्यावर उरली केवळ श्रद्धा कपूर. तर श्रद्धा कपूरला या वेब सीरिजसाठी विचारणा झाल्याचे कळतेय. पण इथेही एक टिष्ट्वस्ट आहे. श्रद्धा कपूरच नाही तर परिणीती चोप्रा हिचेही नाव या वेब सीरिजसाठी चर्चेत आहे. अर्थात खरे सांगायचे तर श्रद्धा कपूर ही कबीरची पहिली चॉईस आहे आणि परिणीतही सेकंड चॉईस.आता सरतेशेवटी श्रद्धा व परिणीती यापैकी कुणाचे पारडे जड होते, ते आपण बघूच. तोपर्यंत या वेब सीरिजबद्दलची बित्तंमबातमी आम्ही तुम्हाला कळवत राहूच.