Join us  

इन्स्टा फॉलोअर्सच्या शर्यतीत श्रद्धा कपूरने दीपिकाला दिली मात, गाठला इतक्या कोटींचा पल्ला

By रूपाली मुधोळकर | Published: November 03, 2020 5:03 PM

दीपिका पादुकोणला मात देत श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी तिसरी अभिनेत्री बनली आहे. 

ठळक मुद्देश्रद्धाचे इन्स्टावर 5 कोटी 64 लाखांवर तर दीपिकाचे 5 कोटी 23 लाख फॉलोअर्स आहेत.

इन्स्टाग्राम हे फोटो शेअरिंग अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी या अ‍ॅपवर अ‍ॅक्टिव्ह आहेत. आता इन्स्टाग्राम म्हटल्यावर फॉलोअर्स आलेच आणि सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रिटींचा गवगवाही आलाच. तूर्तास श्रद्धा कपूरचा इन्स्टाग्रामवर बोलबाला आहे. दीपिका पादुकोणला मात देत श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी तिसरी अभिनेत्री बनली आहे. 

आधी दीपिका पादुकोण या यादीत तिस-या स्थानावर होती. तर श्रद्धा चौथ्या स्थानावर होती. मात्र आता दीपिकाला मागे टाकत श्रद्धा तिस-या क्रमांकावर आली आहे. तर दीपिका चौथ्या स्थानावर घसरली आहे. श्रद्धाचे इन्स्टावर 5 कोटी 64 लाखांवर तर दीपिकाचे 5 कोटी 23 लाख फॉलोअर्स आहेत.

श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती इच्छाधारी नागीन बनताना दिसणार आहे. एका सिनेमात ती नागीनची भूमिका साकारणार आहे. याशिवाय चंदा मामा दूर के , शॉटगन शादी या सिनेमात तिची वर्णी लागली आहे. लव रंजनच्या एका सिनेमातही ती झळणार आहे.दीपिकाचे म्हणाल तर सध्या शकुन बत्राच्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटींगसाठी दीपिका गेल्या काही दिवसांपासून गोव्याला होती. तिच्या या आगामी सिनेमात अनन्या पांडे व सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

प्रियंका दुस-या स्थानावर

तूर्तास इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणा-यामध्ये प्रियंका चोप्रा दुस-या स्थानावर आहे. तिचे 5 कोटी 81 लाख फॉलोअर्स आहेत. आलिया भटचे 5 कोटी 1 लाख, नेहा कक्करचे 4 कोटी 82 लाख फॉलोअर्स आहेत.

विराट नंबर वनइन्स्टावर सर्वाधिक फॉलो केल्या जाणा-या सेलिब्रिटींमध्ये क्रिकेटपटू विराट कोहली अव्वल ठरला आहे. त्याचे इन्स्टावर 8 कोटी 22 लाख फॉलोअर्स आहेत. विराटनंतर प्रियंका चोप्राचा नंबर आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूरदीपिका पादुकोण