Join us

श्रध्दा कपूर घेतेय बायोपिकवर प्रचंड मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 17:31 IST

 प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री श्रद्धा कपूर ही लवकरच एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्यावर ...

 प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री श्रद्धा कपूर ही लवकरच एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्यावर आधारित चित्रपटात ती हसीनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. बायोपिक म्हटले की, अगदी त्या व्यक्तीसारखे अगदी हुबेहुब दिसण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. म्हणूनच श्रद्धा स्वत:वर बरीच मेहनत घेत आहे. तिची भूमिका अधिक सशक्त व्हावी याकरिता श्रद्धा काहीच कसर ठेवत नाहीये. या चित्रपटात श्रद्धा चार विविध लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटात हसीना पारकरचा १७ ते ४० या वयातील जीवनप्रवास दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे तरुणपणातील हसीनाची भूमिका साकारण्यासाठी श्रद्धा त्या वयोगटातील मुलींचे बारकाईने निरीक्षण करत आहे. त्याचसोबत डोंगरी परिसरात राहत असलेल्या लहान मुलींचीही ती भेट घेणार आहे. श्रद्धा कपूरने हसीनाची भूमिका साकारण्यासाठी स्वत:ला पूर्णपणे त्यात झोकून दिले आहे. लहानपणापासून ते आई होण्यापर्यंतचा हसीनाचा जीवनप्रवास यात दाखविण्यात येणार असल्याने श्रद्धा प्रेग्नेंसी व्हिडिओदेखील पाहत आहे. जेणेकरून, तिला भूमिकेतील बारकावे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यास मदत होईल. सध्या ट्रॉम्बे स्टुडिओमध्ये श्रद्धा चित्रीकरण करत आहे. याविषयी बोलताना श्रध्दा सांगेत की,  एक अभिनेत्री म्हणून विविध भूमिका साकारण्याची आणि प्रत्येक चित्रपटाद्वारे एक वेगळा प्रवास करण्याची संधी मला मिळते. प्रत्येक प्रवासात वेगवेगळी तयारी करणे आवश्यक असते. यातच खरे आव्हान आहे. हसीना- द क्वीन आॅफ मुंबई या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहे. हा चित्रपट १४ जुलैला प्रदर्शित होणार आहे. चला तर पाहूयात श्रध्दाची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का?