Join us  

'दबंग ३'चं शूटिंग पुन्हा अडचणीत, शिवलिंग वादानंतर समोर आलं आता नवं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 3:15 PM

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट 'दबंग ३'च्या चित्रीकरण वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. म

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट 'दबंग ३'च्या चित्रीकरण वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. मध्य प्रदेशमधील शिवलिंग विवादानंतर आता समजते आहे की 'दबंग ३'चा शूटिंग सेट मध्यप्रदेशमधील मांडू येथील जल महल वरून हटवावे लागले. सूत्रांच्या माहितीनुसार जल महलमध्ये 'दबंग ३'चे शूटिंग सुरू होते. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने नोटिस पाठवल्यानंतर दबंगचा सेट काढावा लागला. नुकतेच मुंज तलावात चित्रीकरण करण्यात आले.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने सलमान खान आणि त्याच्या टीमला आदेश दिला की मध्य प्रदेशमधील मांडू येथील ऐतिहासिक जल महलमध्ये बनवण्यात आलेले सेट काढून टाकावेत. नोटिसनुसार 'दबंग'च्या क्रुने जल महलमध्ये सेट बनवून प्राचीन स्मारक व पुरातत्व स्थळ आणि अवशेष अधिनियम १९५९च्या नियमाचे उल्लंघन केले आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'दबंग ३'च्या टीमवर आरोप आहे की, त्यांनी नर्मदा नदीजवळ असलेल्या किल्ल्याला नुकसान पोहचवले आहे.

'दबंग ३' चित्रपट 'दबंग' फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हासलमान खान ही जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहेत आणि हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खानच्या प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर सलमान लवकरच 'भारत' चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. यात सलमान सोबत कतरिना कैफही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तसेच सलमान संजय लीला भन्साळीच्या 'इंशाअल्लाह'मध्ये देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात त्याच्यासोबत आलिया भट झळकणार आहे.

टॅग्स :दबंग 3सलमान खानसोनाक्षी सिन्हाभारत सिनेमाप्रभू देवा