Shocking : आईच्या मृत्युस सनी लिओनी जबाबदार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 17:21 IST
पोर्न स्टार ते बॉलिवूडपर्यंत प्रवास करणारी सनी लिओनीची डॉक्युमेंट्री दिलीप मेहता यांनी तयार केली होती. ही डॉक्युमेंट्री गेल्यावर्षी विविध ...
Shocking : आईच्या मृत्युस सनी लिओनी जबाबदार?
पोर्न स्टार ते बॉलिवूडपर्यंत प्रवास करणारी सनी लिओनीची डॉक्युमेंट्री दिलीप मेहता यांनी तयार केली होती. ही डॉक्युमेंट्री गेल्यावर्षी विविध फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून वर्ल्डवाईड रिलीज करण्यात आली होती. ही डॉक्युमेंट्री आता नेटफ्लिक्सवरही उपलब्ध आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये सनीच्या लाइफबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. त्यात आईच्या मृत्युस सनी जबाबदार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यात सनीने म्हटले आहे की, ‘मी माझ्या आईला माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहिले आहे. मी तिला मॉर्फिनचा अखेरचा डोस दिला होता. त्यानंतर ती झोपायला गेली. कधी-कधी मला वाटते मी दिलेल्या शेवटच्या डोसमुळे तिचे प्राण गेले. तिला मी मारले असे मला वाटत नाही, पण औषध घेतल्यानंतर लगेचच तिचा मृत्यू झाला होता. ’ सनीने डॉक्युमेंट्रीमध्ये सांगितले आहे की, जेव्हा मी पेंटहाऊस मॅगझिनसाठी सर्वात आधी पोज दिली, त्यावेळी माझे आईृवडील जीवंत होते. त्यांना याबाबत माहिती नव्हते. कारण मी घराच्या आसपासच्या सर्व दुकानांवर जाऊन मॅगझिन दिसले की, ते खरेदी करून घ्यायचे. सनीने सांगितले आहे की, ‘मी पेंटहाऊस मॅगझिनचा पेट आॅफ द ईअर अवॉर्ड जिंकल्यानंतर पोर्न करिअरबाबत आईला सांगितले होते.’ जेव्हा सनीला एक लाख डॉलरचे बक्षीस मिळाल्याचे तिने घरी सांगितले तर त्यांना लॉटरी लागल्यासारखे वाटेल, असे तिला वाटले होते. पण तिची आई फार वेळ गप्प होती आणि नंतर म्हणाली, तू नेकेड झाली होती. वडील म्हणाले, हा निर्णय घेण्याआधी तू आम्हाला विचारले का नाही? मी फक्त एवढेच सांगू शकतो की, जेही करशील ते चांगले कर. सनीने सांगितले, मी जेव्हा पेंटहाऊसच्या कव्हरसाठी पोज केले तेव्हा लोक माझा तिरस्कार करू लागले होते. लोक मला म्हणायचे, तू भारतीय नाहीस, तू स्त्री नाहीस. तू आमची संस्कृती आणि भारतीय लोकांना बदनाम केले आहे. मी या सवार्चा सामना १९ वर्षांची असताना केला होता. Also Read : सनी लिओनीने सलमान खानसोबतच्या नात्याविषयी केला मोठा खुलासा!!