Join us

Shocking : रिअल लाइफमध्ये ‘बाहुबली’मधील भल्लालदेवचा एक डोळा दृष्टिहीन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 21:55 IST

सध्या देशभरात फक्त ‘बाहुबली-२’ या एकाच चित्रपटाचे नाव प्रेक्षकांच्या ओठी आहे. बाहुबली, भल्लालदेव यांच्या दमदार अभिनयाचे किस्से सध्या गल्लोगल्ली ...

सध्या देशभरात फक्त ‘बाहुबली-२’ या एकाच चित्रपटाचे नाव प्रेक्षकांच्या ओठी आहे. बाहुबली, भल्लालदेव यांच्या दमदार अभिनयाचे किस्से सध्या गल्लोगल्ली रंगत आहेत. त्यामुळेच दोनच दिवसांत २२३ कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. प्रत्येक गोष्टीत रेकॉर्ड करणाºया या चित्रपटातील भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबती याच्याबाबतीत आम्ही एक धक्कादायक बातमी तुम्हाला सांगणार आहोत. अर्थात ही बातमी राणाच्या फॅन्ससाठी निराशाजनक असेल. कारण रिअल लाइफमध्ये राणा दग्गुबती एका डोळ्याने अधू आहे.  विश्वास बसत नाही ना? पण हे खरे आहे. राणा फक्त एकाच डोळ्याने बघू शकतो. एका वृत्तानुसार राणा डाव्या डोळ्याने बघू शकत नाही. लहानपणी राणाला डावा डोळा कोणीतरी डोनेट केला होता. मात्र त्याने तो कधीच बघू शकला नाही. याबाबतचा खुलासा राणाने एका तेलगू भाषिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये केला. या शोमध्ये नेहमीच सेलिब्रिटी येत असतात. एक दिवस अनाथांसोबत व्यतित करणे अशी या शोची कन्सेप्ट असून, यात राणादेखील सहभागी झाला होता. त्याचवेळी त्याने याबाबतचा खुलासा केला. या शोचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे या शोमध्ये येणारा कलाकार त्याच्या एका दिवसाच्या कमाईचा १० टक्के हिस्सा याठिकाणी दान करीत असतो. याठिकाणी आल्यानंतर आपल्या भावना मांडताना राणाने सांगितले की, ‘मी तुम्हाला एक गोष्ट सांगू काय? जर मी माझा उजवा डोळा बंद केला तर मला काहीच दिसणार नाही.’ राणाचे हे शब्द अनेकांना धक्का देणारे होते. जेव्हा राणा बोलत होता तेव्हा सगळेच हतबल होऊन त्याच्याकडे बघत होते. मात्र पुढच्या वाक्यात जेव्हा राणाने ‘मी या अधूपणामुळे कधीच खचलो नाही’ असे म्हटले तेव्हा सगळेच भावूक झाल्याचे दिसून आले. आता या बातमीवर राणाच्या चाहत्यांचा कितपत विश्वास बसणार, हे सांगणे जरी अवघड असले तरी राणा वास्तवात एका डोळ्याने अधू आहे. मात्र त्याच्यातील हा दोष कधीच दिसून आला नसून, त्याने आपल्या दमदार अभिनयाने अनेकांना जिंकले आहे. बाहुबली सीरिजमध्ये जरी तो नकारात्मक भूमिका साकारताना दिसत असला तरी त्याची भूमिका अनेकांना भावली आहे. बाहुबलीच्या तोडीस त्याची भूमिका असल्याने त्याच्या भूमिकेकडेही नायक म्हणूनच बघितले जाते.