Join us  

धक्कादायक ! अज्ञात व्यक्तीने 'या' अभिनेत्रीचे काढले होते आक्षेपार्ह फोटो, सोशल मीडियावर केले होते व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 11:27 AM

'येवडू' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने तीचे आक्षेपार्ह फोटो काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले.  श्रुतीला याचा धक्का बसला पण नंतर तिने पोलिसांत यांबद्दल तक्रार दिली.

सुपरस्टारची मुलगी असल्यामुळे श्रृति हासनच्या वाट्याला फारसे कोणी गेले नाही. त्यामुळे बॉलिवूडमध्येही समाधानकारक अनुभव आल्याचेही तिने म्हटले आहे. कमल हासनमुळे करिअरला नक्कीच फायदा झाल्याचेही तिने मान्य केले आहे. कोणतीही सिनेसृष्टी असो प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत समानता ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. ब-याचजणी वेगवेगळ्या गोष्टींवर आवाजही उठवत आहेत. याबाबत सवाल जवाब होत आहेत ही गोष्ट अधिक समाधानकारक असल्याचे तिने सांगितले. 

अनेकदा अभिनेत्रींचे एमएमएस लिक झाल्याच्या घटना घडतात. अनेक घटना घडल्याच्या आपण ऐकतोच. अशाच घटनांना बॉलिवूड आणि साउथ इंडियन सिनेमाची अभिनेत्री श्रुती हासनही बळी पडली होती. तसेच अभिनयाला सुरूवात केल्यानंतर सेलिब्रेटी स्टेटस निर्माण झाले. बाहेर पडताच नेहमी चाहत्यांचा गराडा असायचा.त्यामुळे पूर्वीप्रमाणे मनसोक्त फिरणे हे बंदच झाले. सेलिब्रेटी हा टॅग लागल्याने स्वतःवर अनेक बंधन लावली. तरीही अशा काही घटना घडल्या ज्या घडायला नको होत्या असे वारंवार वाटते. आजही त्या गोष्टी आठवतात तेव्हा संताप होतो. 

येवडू सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने तीचे आक्षेपार्ह फोटो काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. श्रुतीला याचा धक्का बसला पण नंतर तिने पोलिसांत यांबद्दल तक्रार दिली. पण जेव्हा तिचे असे फोटो काढतंय हे तिला कळालेच नाही. फोटो जेव्हा सोशल मीडियावर आले तेव्हा मात्र तिच्या पाया खालची जमीनच घसरली. तेव्हापासून श्रृति खूप अलर्ट झाली आहे. धांदरट स्वभावामुळे अनेक गोष्टी आपल्यावरच हावी होतात. असाच तो काहीसा प्रकार घडल्याचेही तिने म्हटले होते. पण कुठेही काम करताना, बाहेर फिरताना स्वतःहून आणखीन खबरदारी घेण्याची गरज असल्याचे तिने सांगितले होते.

टॅग्स :श्रुती हसनकमल हासन