Join us

SHOCKING : ​‘फिरंगी’च्या अभिनेत्रीचा खुलासा : ट्रेनमध्ये झाला होता विनयभंगाचा प्रयत्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 11:08 IST

कपिल शर्माचा चित्रपट ‘फिरंगी’ १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. कपिल आणि अभिनेत्री इशिता दत्ता चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ...

कपिल शर्माचा चित्रपट ‘फिरंगी’ १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. कपिल आणि अभिनेत्री इशिता दत्ता चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इशिताने आपल्यासोबत झालेल्या विनयभंगाबाबत खुलासा केला आहे.  काही दिवसांपासून महिलांसोबत होत असलेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात सोशल मीडियावर ‘#MeToo’ अभियान चालविण्यात आले होते. यावर इशिताला प्रश्न विचारण्यात आला असता तिने सांगितले की, ‘हो, माझ्यासोबतही तसे घडले आहे.’ इशिता पुढे म्हणते की, ‘कॉलेजला असताना माझ्यासोबतही छेडछाड झाली आहे. 'मी ट्रेनने कॉलेज जायायची आणि एकदा कोणीतरी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. तो एक वयस्क व्यक्ती होता, मात्र मी चुप राहिली नाही.’ इशिताने सांगितले की, ‘न घाबरता मी सर्व लोकांसमोर त्याचा अपमान केला होता. त्याला खूपच लाज वाटू लागली होती.’ त्यानंतर इशिताने अजून अशाच एका घटनेच्या बाबतीत सांगितले. ही घटनादेखील कॉलेजच्या काळातच घडली होती. इशिताने सांगितले की, ‘रेल्वे ब्रिजवर एका मुलाने मला हात मारला. त्याचा हात माझ्या शरीरावर येताच मी त्याचा हात पकडला आणि त्याचा हात एवढ्या जोराने पिळला की, तो आयुष्यभर विसरणार नाही. इशिताने याअगोदर ‘दृश्यम’ या चित्रपटात अजय देवगणसोबत काम केले आहे. इशिताने मात्र आपल्या करियरची सुरुवात तेलुगु चित्रपट ‘चाणक्युडु’ पासून केली होती. बॉलिवूडमध्ये २०१५ मध्ये ‘दृश्यम’ चित्रपटातून आली. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू आणि श्रीया सरण यासारखे प्रसिद्ध स्टार्ससोबत काम केले होते. यात तिने, अजयच्या मुलीची भूमिका साकारली होती. Also Read : कपिल शर्माची भाची समायराने केले ‘फिरंगी’चे प्रमोशन...पाहा, एक क्यूट व्हिडिओ!