Shocking : दीपिका पादुकोणचे पहिले प्रेम होते 'हा' अभिनेता, रणवीर सिंहला बसला धक्का !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 17:35 IST
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणने आपल्या आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला. या खुलाशाने रणवीर सिंहला मोठा धक्काच बसला आहे. सध्या ...
Shocking : दीपिका पादुकोणचे पहिले प्रेम होते 'हा' अभिनेता, रणवीर सिंहला बसला धक्का !
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणने आपल्या आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला. या खुलाशाने रणवीर सिंहला मोठा धक्काच बसला आहे. सध्या दीपिका संजय लीला बंसालीच्या निर्देशनात बनणारा ‘पद्मावती’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दीपिका पादुकोण आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शूटिंगचे फोटो शेअर करीत राहते. दीपिकाने केलेल्या खुलाशानुसार तिचा सीक्रेट क्रश एक हॉलिवूड अभिनेता होता. दीपिका सध्या रणवीर सिंहच्या प्रेमात बुडाली असेल मात्र लहानपणी ती दुसऱ्या प्रेम करायची. नुकतेच तिच्या रुममधले काही फोटो व्हायरल झाले. त्यात आपण समजु शकाल की, हॉलिवूड स्टार लियोनार्डोला ती लहानपणी खूपच पसंत करत होती. त्यामुळे लियोनार्डोची सुपरहिट चित्रपट ‘टायटॅनिक’चे बरेच फोटो तिच्या रुममध्ये लावलेली आहेत. सध्या दीपिका ‘पद्मावती’च्या शूटिंगमध्ये खूपच व्यस्त असून या चित्रपटात दीपिका शिवाय शाहिद कपूर आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २०१८ च्या सुरुवातील प्रदर्शित होण्याचे संकेत आहेत. Also Read : दीपिका पादुकोण म्हणाली, माझे नाही, विन डिझेलचे माझ्यावर प्रेम होते !