Join us

SHOCKING! ​ दिल्लीची स्थिती पाहून हळहळला अर्जुन कपूर! वरूण धवनने दिला स्वत:ला दोष!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 15:05 IST

राजधानी दिल्लीला सध्या प्रदूषणाने विळखा घातला आहे. अख्खी दिल्ली गॅस चेंबरमध्ये बदलली आहे. याचमुळे सामान्यांनाच नव्हे तर सेलिब्रिटींनाही दिल्लीच्या या प्रदूषणामुळे मास्क लावून हिंडावे लागत आहे.

राजधानी दिल्लीला सध्या प्रदूषणाने विळखा घातला आहे. अख्खी दिल्ली गॅस चेंबरमध्ये बदलली आहे. वायू प्रदूषणाचा प्रश्न इतका गंभीर बनलायं की, दिल्ली एनसीआरमध्ये आरोग्य आणीबाणीसारखी स्थिती आहे. याचमुळे सामान्यांनाच नव्हे तर सेलिब्रिटींनाही दिल्लीच्या या प्रदूषणामुळे मास्क लावून हिंडावे लागत आहे.​विश्वास बसत नसेल तर वरूण धवनचा हा ताजा फोटो तुम्ही पाहायला हवा.  वरूणने स्वत:चा मास्क लावलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करत, दिल्लीतील वायू प्रदूषणाकडे लक्ष वेधले आहे. ‘मी कोणालाच याबद्दल (प्रदूषणाबद्दल) दोष देत नाही. कारण इतरांइतकाच याला मीसुद्धा  तितकाच जबाबदार आहे. पण, आता एकमेकांवर आणि सरकारवर आरोप-प्रत्यारोप  करण्यापेक्षा आपण स्वत:मध्ये काही महत्त्वाचे बदल घडवून आणण्याची गरज आहे’, असे त्याने या पोस्टसोबत लिहिले आहे. अभिनेता अर्जुन कपूर यानेही  दिल्लीतील धुरके (धूर आणि धुके एकमेकांमध्ये मिसळले की या प्रकारचे धुरके तयार होते. ) किती गंभीर आहे, हे सांगितले आहे. अर्जुनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सध्या अर्जुन दिल्लीत एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान धुरक्यामुळे झालेल्या एका अपघाताचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ‘शूटींगसाठी दिल्लीत तळ ठोकून आहे. पण अशी जीव गुदमरून टाकणारी दिल्ली पाहताना अपार वेदना होत आहेत. राजकारण आणि खासगी अजेंडे बाजूला ठेवून आपल्याला या समस्येचे समधान शोधले पाहिजे. नाहीतर आपण सगळेच याचे बळी ठरू. दिल्लीत जे काही सुरु आहे ते इतके भयावह आहे, याची कल्पनाही आपण करू शकत नाही,’ असे अर्जुनने लिहिले आहे. अर्जुनने शेअर केलेल्या व्हिडिओत धुरक्यामुळे एकापाठोपाठ एक गाड्या एकमेकांवर आदळत असल्याचे तुम्ही बघू शकता. एकंदर काय तर अर्जुन व वरूण दोघांनीही एका गंभीर समस्येकडे आपणा सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याला आपण कसा प्रतिसाद देतो, ते निश्चितपणे आपल्यावर अवलंबून आहे.