Join us  

Sandeep Nahar Suicide: Shocking!, अभिनेता संदीप नहारची हत्या? गळ्यावर जखमा, संशयाची सुई पत्नीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 3:30 PM

Sandeep Nahar Suicide : अभिनेता संदीप नहार सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आयुष्य संपवले.

'केसरी' आणि 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' सारख्या चित्रपटात काम करणारा अभिनेता संदीप नहार याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आयुष्य संपवले. मात्र, आता या सर्व प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संदीप नहारच्या गळ्यावर संशयास्पद निशाण आढळले आहेत. गोरेगाव पोलीस याची सखोल तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नहारने आत्महत्या केली तेव्हा पत्नी कांचन शर्माने सुतारांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला. त्यानंतर तिने संदीप नहारला घराजवळच्या रुग्णालयात नेले. पण तिथल्या रुग्णालयाने संदीपला अॅडमिट करून घेण्यास नकार दिला. जेव्हा ती दुसर्‍या रुग्णालयात पोहोचली तेव्हा डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केले. 

संदीपच्या गळ्यावर आढळल्या जखमाआता या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांना संशय येत आहे. कारण संदीपच्या गळ्यावर जखमा आढळल्या आहेत. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. सध्या मुंबई पोलिसांचा सायबर सेल संदीप नहारच्या सोशल मीडिया अकाउंटवरही चौकशी करत आहे. संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. यात त्यानं कौटुंबिक आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्ट्रगलमुळे मानसिक तणावात असल्याचं म्हटलंय. यासोबत जीवन संपविण्याच्या त्याच्या या निर्णयाला पूर्णपणे स्वत: जबाबदार असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

 काय म्हटलंय आत्महत्येआधी पोस्ट केलेल्या व्हिडीओत?  याशिवाय संदीपने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अस्वस्थ होता असे सांगितले. संदीप नहार याने शेअर केलेल्या १० मिनिटांच्या व्हिडिओमध्ये म्हटले की, 'मी तुम्हाला बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसलो असेन. मी एमएस धोनी सिनेमात छोटू भैय्याची भूमिका साकारली होती. आज हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की माझ्या आयुष्यात बर्‍याच समस्या आहेत. मी मानसिकदृष्ट्या स्थिर नाही. याला कारण माझी पत्नी कंचन शर्मा आहे. मी दीड- दोन वर्षांपासून एका मानसिक ताणात जगत आहे. मी बायकोला वारंवार समजावून सांगितले. आमचं ३६५ दिवस भांडण होतं.'

'ती म्हणते की ती आत्महत्या करेल आणि त्यात मला अडकवेल. मी पूरता वैतागून गेलो आहे. माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करते. माझ्या आईला शिव्या देते. तिच्यासमोर मी घरच्यांचे फोनही उचलू शकत नाही. माझे नाव कोणाशीही जोडते. ती नेहमीच माझ्यावर संशय घेते. संशयाला कोणतेही औषध नाही. काही दिवसांपूर्वी ती घरातून पळून गेली होती. मी तिला शोधले. तिची आईच तिला साथ देते. एवढेच नाही तर केस करण्याचीही धमकी देते.'

संदीप नहारने पुढे म्हटले की, 'कंचनचा २०१५-१६ मध्ये एक एक्स होता. ज्याच्यासोबत सहा वर्ष ती राहिली होती. तिने आपल्या एक्सला एका खोट्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले. मला तिची दया आली होती म्हणून मी लग्न केलं. पण आमच्यात कोणतीच गोष्ट सारखी नव्हती. कोरोना काळात जेव्हा आम्ही घरी गेलो होतो. तेव्हा तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले.''मित्रांनो, मी काही केले तर कंचनने माझ्या घरातील सदस्यांना त्रास देऊ नये. ती माझ्या कुटुंबाचा खूप द्वेष करते. त्यांच्याविरोधात तिने केस करू नये. माझी बुलेट मला बाबांना द्यायची आहे. सोनसाखळी आईला द्यायची आहे. पैसे कंचनने घ्यावेत. ती स्वतःच्या चुका कधी मान्य करत नाहीत. तिला तिच्या चुका लक्षात याव्यात अशी अपेक्षा आहे. जर भविष्यात तिने लग्न केले तर त्या माणसाने सर्वात आधी तिच्या मेंदूवर काहीतरी उपचार करून घ्यावेत.', असे संदीपने व्हिडीओत म्हटले आहे.

टॅग्स :संदीप नहारसुशांत सिंग रजपूतअक्षय कुमारकेसरी