Shocking : अनुष्का शर्माच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात; टेक्निशियनचा मृत्यू !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 19:00 IST
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची आगामी ‘परी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली असून, यामध्ये टेक्निशियनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू ...
Shocking : अनुष्का शर्माच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात; टेक्निशियनचा मृत्यू !
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची आगामी ‘परी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली असून, यामध्ये टेक्निशियनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. शाह आलम असे नाव असलेल्या टेक्निशियनच्या मृत्यूमुळे सध्या शूटिंग रद्द करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुष्का आणि परमव्रत चॅटर्जी दक्षिणेतील परगना जिल्ह्यातील कोरोलबेरियामध्ये ‘परी’ या चित्रपटाची शूटिंग करीत आहेत. याचदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना लेदर कॉम्प्लेक्स पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत झालेला २८ वर्षीय बॉलिवूड टेक्निशियन शाह आलम उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. ज्याठिकाणी शूटिंगचा सेट लावण्यात आला होता त्याठिकाणी बांबूची झाडे होती. लाइट इम्पॅक्ट देण्यासाठी बांबूच्या झाडांना तारांनी सजविले होते; मात्र शूटिंग झाल्यानंतर पॅकिंग दरम्यान, एका उघड्या तारेला शाह याचा स्पर्श झाला. त्यामुळे त्याला जोरदार झटका बसल्याने तो बेशुद्ध झाला. शाहला लगेचच एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तोपर्यंत बराचसा उशीर झाला होता. काही काळानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, शाह आलम याचे शव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, पोलीस याप्रकरणाचा तपास करीत आहेत. याच दरम्यान निर्मात्यांनी शूटिंग रद्द केली असून, सगळ्यांनाच या घटनेचा धक्का बसला आहे. अनुष्कालाही ही बाब सांगण्यात आल्याचे समजते. जेव्हा अनुष्काला या दुर्घटनेविषयी माहिती झाले तेव्हा तिनेही याविषयी हळहळ व्यक्त केली गेली. आता शूटिंगच्या दुसºया टप्प्याविषयी अद्यापपर्यंत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे शूटिंगमध्ये बराचसा खंड पडला जाण्याची शक्यता आहे.