Join us  

शोएब मलिकचं फ्लर्टिंग सुरुच? तिसऱ्या लग्नानंतरही 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीला करतोय मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 4:04 PM

एका पाकिस्तानी शोमध्ये अभिनेत्रीने नेमकं काय सांगितलं?

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने (Shoaib Malik) काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सना जावेदसोबत निकाह केला. शोएबचं हे तिसरं लग्न आहे. याआधी तो भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचा नवरा होता. मात्र शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळे सानियाने कंटाळून त्याला खुला म्हणजेच घटस्फोट दिला. नंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत विवाह केला. मात्र शोएब यावरच थांबला नसून आता तो आणखी एका पाकिस्तानी अभिनेत्रीला मेसेज पाठवत फ्लर्ट करत असल्याची चर्चा आहे. 

शोएब मलिक आणि वाद काही थांबत नाहीयेत. आता तो पुन्हा एकदा एका नवीन वादात अडकला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री नवल सईदने (Nawal Saeed)नुकतंच एका पाकिस्तानी शोमध्ये तिला क्रिकेटर्सकडून येणाऱ्या फ्लर्टिंग मेसेजचा खुलासा केला. ऐजाज असलम आणि नादिया खान यांनी रमजाननिमित्त एक शो आयोजित केला होता. यामध्ये नवल सईद सहभागी झाली. तेव्हा नवल म्हणाली,'मी नाव घेणार नाही पण मला काही क्रिकेटपटूंकडे सतत इन्स्टाग्रामवर फ्लर्टिंग मेसेज येतात. मी खेळाडूंचा खूप आदर करते त्यामुळे त्यांनी असं वागणं अपेक्षित नाही. त्यातले काही विवाहित आहेत.' यावर तिला कोणत्या क्रिकेटरने तुला असे मेसेज पाठवलेत असं विचारलं गेलं. पण तिने थेट नाव घेणं टाळलं. मग नादिया खाननेच तिला सरळ शोएब मलिक का? असा प्रश्न विचारला. यावर नवलने केवळ गालातल्या गालात हसून उत्तर देणं टाळलं. त्यामुळे तो शोएब मलिकच आहे अशी चर्चा रंगली आहे.

नवल सईद लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री आहे. 2017 साली तिने 'यकीन का सफर' मधून पदार्पण केलं. नंतर तिने अनेक थिएटरमध्ये आपलं नशीब आजमावलं. नवलच्या सौंदर्यावर पाकिस्तानी चाहते फिदा आहेत. त्यामुळे शोएबही तिच्यावर भाळला असणार यात शंका नाही अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. यावरुन शोएब पुन्हा एकदा जबरदस्त ट्रोल होत आहे.

टॅग्स :शोएब मलिकपाकिस्तानरिलेशनशिपसोशल मीडियाट्रोल