Join us

शिल्पा शिरोडकर ठरली कोरोना लस घेणारी पहिली अभिनेत्री, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 10:43 IST

शेअर केला लस घेतल्यानंतरचा अनुभव...

ठळक मुद्देशिल्पा शिरोडकरने नव्वदीच्या दशकात भ्रष्टाचार, योद्धा, हम, आँखे, गोपी किशनसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

जगभर थैमान घालणा-या कोरोना व्हायरसच्या बिमोडासाठी लस आली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. भारतात लवकरच लसीकरण सुरु होणार आहे. त्याआधी लसीकरणाची रंगीत तालीम अर्थात ‘ड्राय रन’ पार पडत आहे. पण बातमी ‘ड्राय रन’ची नाही तर कोरोनाची लस घेणा-या पहिल्या बॉलिवूड अभिनेत्रीची आहे. होय, गोपी किशन, हम, वेबफा सनम, खुदा गवाह अशा अनेक सिनेमात झळकलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोरोना लस घेणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. अर्थात तिने ही लस भारतात नाही तर दुबईत घेतली. लस घेतल्यानंतरचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शिल्पाने फोटोंसह लस घेतल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. या फोटोंमध्ये शिल्पाने चेह-यावर मास्क लावला आहे आणि तिच्या हातावर लस टोचलेल्या जागी पट्टी लागलेली दिसते. ‘व्हॅक्सिनेटेड अ‍ॅण्ड सेफ ... 2021 मी येतेय,’ असे फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे. शिल्पाचा हा फोटो सध्या वेगाने व्हायरल होतोय.

आत्तापर्यंत कोणत्याही भारतीय अभिनेत्रीने कोरोनाची लस घेतलेली नाही. शिल्पा शिरोडकर दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. मात्र लवकरच ती कमबॅक करणार आहे. 2000 मध्ये शिल्पाने लग्न केले. लग्नानंतर पाच वर्षे ती भारतात होती. यानंतर ती पतीसोबत दुबईत स्थायिक झाली.

शिल्पा शिरोडकरने नव्वदीच्या दशकात भ्रष्टाचार, योद्धा, हम, आँखे, गोपी किशनसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. शिल्पा 2000 नंतर चित्रपटांपासून दूर गेली. पण 13 वर्षांनंतर ती अभिनय क्षेत्राकडे परतली. तिने एक मुठ्ठी आसमान या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने सिलसिला प्यार का या मालिकेत गेल्या वर्षी काम केले. या मालिकेतील तिच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.  

टॅग्स :शिल्पा शिरोडकर