12 वर्षांपूर्वी ‘अपने’ आणि ‘लाईफ इन मेट्रो’ या सिनेमांत अखेरची झळकलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चित्रपटांत परतण्यासाठी सज्ज झाली आहे. होय, शिल्पा लवकरच आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा करू शकते.फिटनेस आणि टीव्ही शोमुळे चर्चेत राहणाºया शिल्पाने 1993 मध्ये शाहरूख खान स्टारर ‘बाजीगर’ या चित्रपटातून आपले फिल्मी करिअर सुरु केले होते. 44 वर्षीय शिल्पा अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. पण अलीकडे एका इव्हेंटमध्ये शिल्पाने आपल्या कमबॅकचे संकेत दिलेत. हिंदी चित्रपटांशी माझे नाते संपलेले नाही. ते आजही कायम आहे. सध्या माझ्याकडे कमीत कमी पाच स्क्रिप्ट आहेत. ज्या मी वाचतेय. मला चित्रपटात अभिनय करायचा आहे. पाचपैकी जी स्क्रिप्ट मला आवडेल, त्या चित्रपटातून मी कमबॅक करेल, असे शिल्पाने सांगितले.
शिल्पा शेट्टी करणार कमबॅक, लवकरच करणार चित्रपटाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 14:28 IST
12 वर्षांपूर्वी ‘अपने’ आणि ‘लाईफ इन मेट्रो’ या सिनेमांत अखेरची झळकलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चित्रपटांत परतण्यासाठी सज्ज झाली आहे.
शिल्पा शेट्टी करणार कमबॅक, लवकरच करणार चित्रपटाची घोषणा
ठळक मुद्देअलीकडे ‘ह्यूमन्स आॅफ बॉम्बे’शी बोलताना शिल्पाने तिच्या स्ट्रगलिंगच्या दिवसातील काही आठवणी शेअर केल्या होत्या.