Join us  

शर्लिन चोप्राने या माध्यमातून एका दिवसात कमविले १० लाख रुपये, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 7:15 AM

शर्लिन चोप्राच्या जीवनावर आधारीत एक शॉर्टफिल्म रसिकांच्या भेटीला आली आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्रा अलीकडेच रॅपर, कॉन्टेंट क्रिएटर व निर्मातीदेखील बनली आहे. काही दिवसांपूर्वी शर्लिनने एक रॅप साँग लाँच केलं. या गाण्याचं खूप कौतूक झालं. या गाण्यानंतर तिला बऱ्याच प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स येत आहेत आणि ती सध्या बिझी आहे. मात्र आता शर्लिन चोप्राच्या जीवनावर आधारीत एक शॉर्टफिल्म रसिकांच्या भेटीला आली आहे. या शॉर्टफिल्मचं नाव आहे द लास्ट विश.

या शॉर्टफिल्मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी शर्लिन चोप्रा अॅपवर दहा लाखांची कमाई करण्यात यशस्वी झाली आहे.

द लास्ट विश शॉर्टफिल्ममध्ये शर्लिनने एका मुलावर मनापासून प्रेम केले होते. या प्रेमात तिला धोका मिळाला. तिच्या या शॉर्टफिल्मचा टीझर प्रदर्शित केला आहे ज्यात ती स्वतः सांगते आहे की, ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच न्यूड कॅटवॉक करायला सांगितलं. आता तोच माझ्यासाठी काम करतो आहे. माझा जीवन प्रवास पहा द लास्ट विशमध्ये. 

तिने आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितलं होतं की,  “एक अभिनेता आणि निर्माता म्हणून मी माझा स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेब सीरिज सुरू करणार आहे. ही वेब सीरिज वेगवेगळ्या शॉर्ट स्टोरीजचे संकलन असेल आणि प्रत्येक कथेत तुम्ही मला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखेत आणि एका नवीन अवतारात पाहू शकणार आहे.

शर्लिन चोप्राने कामसूत्रा, वजाह तुम हो, हडिप्पासारख्या चित्रपटात काम केले आहे.

टॅग्स :बॉलिवूड