Join us  

Shefali Shah : "त्याने गर्दीत चुकीच्या पद्धतीने...", शेफाली शाहने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 9:30 AM

शेफालीने पॉडकास्टमध्ये आयुष्यातील एका भयानक प्रसंगाचे वर्णन केले.

बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभाशाली अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शेफाली शाह (Shefali Shah). वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने अभिनयाची चुणूक दाखवली. आज शेफालीचा वेगळा चाहतावर्ग आहे. 'दिल्ली क्राईम' या वेबसिरीजमधून तिने साकारलेली वर्तिका ही महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका विशेष गाजली. तसेच डार्लिंग सिनेमात तर तिने आलिया भटच्या आईची भूमिका अतिशय उत्तमपणे वठवली. शेफाली तसं तर आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार बोलत नाही. पण नुकतेच तिने पॉडकास्टमध्ये आयुष्यातील एका भयानक प्रसंगाचे वर्णन केले.

शेफालीने पॉडकास्टच्या एका एपिसोडमध्ये 'मान्सून वेडिंग' मधील भूमिकेविषयी माहिती दिली. या सिनेमात तिने रिया वर्माची भूमिका साकारली होती जिचे लहानपणी लैंगिक शोषण झालेले असते. सिनेमात नसीरुद्दीन शाह, लिलेट दुबे, वसुंधरा दास, विजय राज, रजत कपूर, रणदीप हुड्डा आणि सोनी राजदानची महत्वाची भूमिका आहे.

गर्दीत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला 

फिल्मच्या स्टोरी लाईनला धरुन शेफालीने तिच्या खऱ्या आयुष्यातील एक प्रसंग शेअर केला. ती म्हणाली,'प्रत्येकजण अशा अनुभवातून गेलेला असतो. मला आठवतंय एकदा मी बाजारात फिरत होते खूप गर्दी होती आणि कोणीतरी मला चुकीच्या पद्धातीने स्पर्श केला. मला खूपच विचित्र वाटले. मी कधीच कुठेच काही बोलले नाही कारण हे किती लाजिरवाणं आहे.'

ती पुढे म्हणाली, 'अनेकांना असा प्रश्न पडेल की मी पुढे काही केलं की नाही. पण खरं तर तुम्ही तेव्हा स्वत:ला अराधी समजता. तुम्हालाच लाज वाटते आणि तुम्ही विसरुन जाता. आतल्या आत दाबून ठेवता. प्रामाणिकपणे सांगायचं तर खरंच मी याचा इतका जास्त विचारच नाही केला की मी त्याबद्दल बोलेन. '

शेफालीने 'रंगीला' सिनेमातून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 1998 मध्ये आलेल्या 'सत्या' सिनेमातही तिने अभिनय केला. यासाठी तिला क्रिटिक्स चॉईस अवॉर्डही मिळाला. शेफालीने ओटीटी माध्यमातही प्रचंड यश मिळवले आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलबॉलिवूडमुलाखत