Join us  

राजेश खन्नाविरोधात शत्रुघ्न सिन्हा लढले होते निवडणूक, 'या' गोष्टीबाबत आहे त्यांना पश्चाताप...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 2:31 PM

आपल्या अभिनयाच्या आणि वेगळ्या स्टाइलच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचे काही किस्से आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या काळातील सुपरस्टार होते. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या करिअरमध्ये कमीच सिनेमात लीड रोल केले असेल. जास्तीत जास्त सिनेमात ते सपोर्टिंग रोलमध्ये होते. पण आपल्या अभिनयाच्या आणि वेगळ्या स्टाइलच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचे काही किस्से आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म ९ डिसेंबर १९४५ मध्ये पटणामध्ये झाला होता. देव आनंद यांच्या 'प्रेम पुजारी' सिनेमातून त्यांनी करिअरची सुरूवात केली होती. याआधीही त्यांनी काही सिनेमात कामे केली होती. पण त्यांचे रोल्स लहान होते. करिअरच्या सुरूवातीला त्यांनी जास्तीत जास्त निगेटीव्ह शेड्सच्या भूमिका केल्या होत्या. नंतर हळू हळू त्यांना मोठे रोल्स मिळू लागले होते. खिलौना, चेतना, पारस, मेरे अपने, खोज, गॅंम्बलर, भाई होत तो ऐसा, बॉम्बे टू गोवा, मिलाप, ब्लॅकमेल, आ गले लग जा, परमात्मा विश्वनाथ, काला पत्थर, क्रांति, कयामत, रंगभूमी, पापा द ग्रेट, आन, रक्त चरित्र, महाभारत आणि यमला पगला दिवाना फिरसे सारख्या सिनेमांचा समावेश आहे. 

पॉलिटिकल करिअरबाबत सांगायचं तर शत्रुघ्न सिन्हा हे करिअर दरम्यान भारतीय जनता पक्षासोबत जुळून होते. पण तिकीट न मिळाल्याने त्यांनी २०१९ मध्ये कॉंग्रेमध्ये प्रवेश केला. शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या जीवनात एका गोष्टीचा फार पश्चाताप आहे.

१९९२ मध्ये बायपोल इलेक्शनमध्ये शत्रुघ्न सिन्हा बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना आमनेसामने उभे होते. राजेश खन्ना त्यावेळी कॉंग्रेसचा भाग होते तर शत्रुघ्न सिन्हा भाजपात होते. राजेश खन्ना यांनी साधारण २५ हजार मतांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा पराभव केला होता. आजही त्यांना या गोष्टी पश्चाताप आहे की, त्यांनी त्यांचे मित्र राजेश खन्ना यांच्या विरोधात उभे रहायला नको होतं.

पर्सनल लाइफबाबत सांगायचं तर शत्रुघ्न सिन्हा यांनी १९८० पूनम सिन्हासोबत लग्न केलं होतं. या लग्नातून त्यांना ३ मुले आहेत. सोनाक्षी सिन्हा इंडस्ट्रीत लोकप्रिय चेहरा आहे. तर लव-कुश सिन्हा ही दोन मुले आहेत.  

टॅग्स :शत्रुघ्न सिन्हाराजेश खन्नाबॉलिवूड