Join us  

 शशी थरूर यांना मिळाली होती भाईजानच्या सिनेमाची ऑफर; वाचा, पुढे काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 12:56 PM

सलमानच्याच ‘अंदाज अपना अपना’ या सिनेमात शशी थरूर यांनी काम केल्याची चर्चाही एकेकाळी रंगली होती.

ठळक मुद्दे सध्या सलमान ‘टायगर 3’च्या सिनेमात बिझी आहे. लवकरच तो ‘बिग बॉस’चा 15 वा सीझन होस्ट करताना दिसणार आहे. कालच या शोचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला होता.

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमान खानचा (Salman Khan) सिनेमा येणार म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आता भाईजान ‘टायगर 3’  (Tiger 3)  हा सिनेमा घेऊन येतोय. रशियात या सिनेमाचे शूटींग सुरू आहे. सिनेमात पुन्हा एकदा सलमान व कतरिनाची रोमॅन्टिक केमिस्ट्री आणि जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. तूर्तास मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने एक खास बातमी आहे. होय,  सलमानच्या टायगर सीरिजमधील  एका सिनेमासाठी एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला भूमिका ऑफर केली गेली होती.  या काँग्रेस नेत्याचे नाव काय तर शशी थरूर.

होय, शशी थरूर (Shashi Tharoor)  यांना सलमानच्या एका चित्रपटात परराष्ट्र मंत्र्याची भूमिका ऑफर  केली गेली होती. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, खुद्द शशी थरूर यांनी 2018 मध्ये एका मुलाखतीत सलमानच्या चित्रपटासाठी भूमिका ऑफर झाल्याची माहिती दिली होती. ‘मला सलमानच्या एका चित्रपटामध्ये परराष्ट्र मंत्र्याच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. पण मी या भूमिकेला नकार दिला. परराष्ट्र मंत्री बनायचे असेल तर ही भूमिका करू नकोस, असा सल्ला माझ्या एका मित्राने मला दिला आणि मला त्याचा हा सल्ला योग्य वाटला. म्हणूनच मी ती भूमिका नाकारली,’ असे त्यांनी सांगितले होते.

सलमानच्याच ‘अंदाज अपना अपना’ या सिनेमात शशी थरूर यांनी काम केल्याची चर्चाही एकेकाळी रंगली होती. याबद्दल शशी थरून यांना छेडले असता, त्यांनी यावरही नकारार्थी उत्तर दिले होते. ‘मी त्या चित्रपटात असण्याची शक्यताच नाही. कारण त्यावेळी मी संयुक्त राष्ट्रात कार्यरत होते. मी एका फ्लाईटमध्ये सलमानला भेटलो होतो. मी त्याच्यासोबत सेल्फीही घेतला होता. हा सेल्फी मी सोशल मीडियावरही शेअर केला होता,’ असेही थरूर यांनी स्पष्ट केले होते. सध्या सलमान ‘टायगर 3’च्या सिनेमात बिझी आहे. लवकरच तो ‘बिग बॉस’चा 15 वा सीझन होस्ट करताना दिसणार आहे. कालच या शोचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला होता.

 

टॅग्स :शशी थरूरसलमान खान