Join us  

संजय कपूरची लाडकी लेक शनायाचा साऊथमध्ये डेब्यू, या सुपरस्टारसोबत शेअर करणार स्क्रीन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 3:00 PM

रिपोर्टनुसार शनाया एका पॅन इंडिया चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची लाडकी लेक शनाया कपूर तिच्या डेब्यूला घेऊन बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. करण जोहरने त्याच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली शनाया लाँच करण्याची घोषणा केली होती. शनायाच्या साऊथ डेब्यूबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार शनाया एका पॅन इंडिया चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार,  शनाया कपूर मोहनलाल यांच्या 'वृषभ' या चित्रपटातून साऊथमध्ये पदार्पण करणार आहे. एकता कपूर निर्मित चित्रपटातील कलाकारांची घोषणा यापूर्वीच झाली आहे. आता एका मीडिया रिपोर्टमध्ये या पॅन इंडिया चित्रपटातील शनायाच्या भूमिकेबद्दल माहिती देण्यात आली आहे. नंद किशोर 'वृषभ'चे दिग्दर्शन करणार आहेत.

एका मीडिया रिपोर्टनुसार, 'चित्रपटाची कथा वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. वृषभमध्ये शनाया कपूरची भूमिका अतिशय डायनॅमिक आहे. ही एक पीरियड फिल्म आहे, ज्यामध्ये भूतकाळ आणि वर्तमान या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. या चित्रपटात शनाया महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एक हाय-ऑक्टेन अॅक्शन ड्रामा आहे.

मोहनलाल स्टारर चित्रपट 'वृषभ'ची तुलना दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या तेलगू सुपरहिट चित्रपट 'मगधीरा'शी केली जात आहे. चित्रपट प्रेम आणि बदला यावर लक्ष केंद्रित करतो. हा प्रामुख्याने तेलुगु आणि मल्याळममध्ये चित्रित केले जाईल आणि संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा हा दक्षिण भारतीय चित्रपट असल्याचे सांगितले जाते.

शनाया कपूर (Shanaya Kapoor)ही बॉलिवूड अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी आहे. शनायाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बी-टाऊनमध्ये रंगली होती.  बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच सोशल मीडियावर शनायाच्या मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर शनाया सक्रिय असते. 

टॅग्स :शनाया कपूरसंजय कपूर