Join us  

मुहूर्त ठरला! मोहनलाल यांच्या पॅन इंडिया सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार संजय कपूरची लेक शनाया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 4:45 PM

शनाया कपूरच्या बॉलिवूड डेब्यूची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

शनाया कपूरच्या बॉलिवूड डेब्यूची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शनाया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि त्याद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आता शनायाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोहनलाल यांच्या पॅन इंडिया चित्रपट वृषभामधून ती पदार्पण करणार आहे. वृषभ बराच काळ प्रसिद्धीच्या झोतात होता. आता त्यातील आघाडीच्या अभिनेत्रींची घोषणा करण्यात आली आहे.

शनायाला वृषभमध्ये अभिनेता रोशन मेकाच्या अपोजिट कास्ट केलं आहे. भव्य अ‍ॅक्शन एंटरटेनर चित्रपटात शनायाची व्यक्तिरेखा  भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडणारी महत्त्वाचा दुवा असणार आहे. शनाया व्यतिरिक्त, या चित्रपटाद्वारे, सलमा आगा यांची मुलगी  जाहरा एस. खान देखील 'वृषभा'मधून डेब्यू करणार  आहे. जाहरा या चित्रपटात योद्धा म्हणून अनेक अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. 

'वृषभा' चित्रपटातून डेब्यू करणारी शनाया कपूर म्हणाली, "कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला खात्री आहे की या चित्रपटाद्वारे  मी काहीतरी शिकू शकेन आणि मला खूप काही जाणून घेण्याची संधी मिळेल.

एका मीडिया रिपोर्टनुसार, 'चित्रपटाची कथा वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. वृषभमध्ये शनाया कपूरची भूमिका अतिशय डायनॅमिक आहे. ही एक पीरियड फिल्म आहे, ज्यामध्ये भूतकाळ आणि वर्तमान या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे.  हा चित्रपट एक हाय-ऑक्टेन अॅक्शन ड्रामा आहे.

मोहनलाल स्टारर चित्रपट 'वृषभ'ची तुलना दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या तेलगू सुपरहिट चित्रपट 'मगधीरा'शी केली जात आहे. चित्रपट प्रेम आणि बदला यावर लक्ष केंद्रित करतो. हा प्रामुख्याने तेलुगु आणि मल्याळममध्ये चित्रित केले जाईल आणि संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा हा दक्षिण भारतीय चित्रपट असल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :शनाया कपूर